24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
Home समाजकारण अनलॉक ५ : खा-प्या पण अभ्यास घरीच करा!

अनलॉक ५ : खा-प्या पण अभ्यास घरीच करा!

165

मुंबई – मार्च महिन्यांपासून बंद असलेले बार आता पुन्हा गजबजणार असून, राज्य सरकारने आज अनलॉक ५ ची नियमावली जाहीर केली असून,हॉटेल्स आणि बार सुरु करण्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ५ ऑक्टोबरपासून राज्यात हॉटेल, रेस्टॉरंटसह बार सुरू होणार असल्याची माहिती समोर आली असून, ५० टक्के क्षमतेने बार आणि हॉटेल्स सुरु करण्याला सरकारने परवानगी दिली आहे.यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.

अनलॉक ५ मध्ये याला परवानगी

१. अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग ही सुरु करण्यास परवानगी
२. राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु करायला परवानगी
३. ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर कसलेही निर्बंध नाही
४. डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी
५. मुंबई महानगर प्रदेश MMR मधील लोकल फेऱ्या वाढवाव्या
६. पुणे विभागातील लोकलवट्रेन सुरू होणार

शाळा-कॉलेज बंद राहणार 

दरम्यान राज्यात बार आणि हॉटेल्स जरी सुरु होत असली तरी देखील शाळा-कालेज ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  अनलॉक ५ मध्ये शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क बंद राहणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline