अमरावतीतील Madrasa मध्ये अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक अत्याचार; मौलानाला पोलीस कोठडी

86
अमरावतीतील Madrasa मध्ये अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक अत्याचार; मौलानाला पोलीस कोठडी
अमरावतीतील Madrasa मध्ये अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक अत्याचार; मौलानाला पोलीस कोठडी

उस्मानिया मस्जीद येथील दारुल ऊलुम मदरशात (Madrasa) शिकणाऱ्या १३ वर्षीय बालकाचे हातपाय बांधून आणि त्याला अश्लील व्हिडिओ दाखवून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धकादायक घटना सोमवारी सकाळी अमरावती (Amravati) येथे उघडकीस आली. या घटनेत कोतवाली पोलिसांनी बालकाच्या वडिलाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून मौलाना (Maulana) सलमान मुफ्ती (वय ३८ रा. बिच्छु टेकडी) याला अटक केली. न्यायालयाने त्याला १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

(हेही वाचा – Andheri Fire: अंधेरीत इमारतीला लागलेल्या आगीत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; एकाची प्रकृती गंभीर)

काय आहे प्रकरण ?

उस्मानिया मस्जीद येथील दारुल ऊलुम मदरसामध्ये १३ वर्षीय बालक ऑक्टोबर २०२४ पासून शिक्षणाकरिता रहात होता. मदरशात जेवणाची आणि रहाण्याची व्यवस्था असल्याने अन्य मुलेसुध्दा तिथे शिक्षणाकरिता रहात होते. २ जानेवारीला रात्री संबंधित मुलगा काही मुलांसोबत आपल्या खोलीत झोपला होता. तेव्हा अचानक चेहऱ्यावर उजेड पडल्यामुळे तो झोपेतून उठला, तेव्हा त्याला मौलाना सलमान मुफ्ती दिसले. त्यानंतर मौलाना यांनी लाईट बंद केला आणि खोलीचे दार लावून त्याच्या खोलीत गेले. काही वेळाने पीडित बालकाला लघुशंका आल्यामुळे तो खोलीच्या बाहेर आला आणि लघुशंका करून जात असताना मौलानाने त्याला आवाज दिला. त्यामुळे मुलगा त्याच्या खोलीत गेला, तेव्हा मौलानाने बालकाला जवळ ओढले आणि पलंगावर झोपवून त्याचे दोन्ही पाय व हात बांधले. आणि त्याला अश्लील व्हिडीओ दाखवत त्याच्याशी जबरदस्ती अनैसर्गिक कृत्य केले. (minor sexual assault )

मदरशात पाठवले, तर आत्महत्या करण्याची मुलाची मानसिकता

त्यानंतर बालक रडत खोलीत गेला आणि रात्रभर रडत राहिला. सकाळ होताच तो गावी गेला. अचानक मुलगा घाबरलेल्या अवस्थेत घरी आल्याने आई-वडील घाबरले. त्यांनी विचारपुस केली असता बालक आई-वडिलांना पकडून रडत होता. तेव्हा त्याला विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. तसेच यापुढे मदरशात शिकायला जाणार नाही आणि तुम्ही जबरदस्तीने पाठविले तर आत्महत्या करणार, असे आई-वडिलांना सांगितले.

रविवारी दुपारी मदरशात (Madrasa) धाव घेऊन पालकांनी मौलानाला खडसावले असता चांगलाच गोंधळ उडाला. अखेर रविवारी रात्री बालकाच्या वडिलांनी कोतवाली ठाण्यात तक्रार दिली. त्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मौलाना सलमान मुफ्तीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.