रेल्वेच्या अनारक्षित गाड्या पूर्ववत धावणार, पहा संपूर्ण वेळापत्रक

110

रेल्वेच्या भुसावळ – देवळाली, भुसावळ – वर्धा, पुणे – सोलापूर, मिरज – हुबळी, मिरज – कॅसल रॉक आणि मिरज – लोंडा दरम्यान धावणाऱ्या अनारक्षित गाड्या खाली दिलेल्या तपशिलानुसार पूर्ववत करण्यात येणार आहेत.

( हेही वाचा : मुंबईकरांना ‘बेस्ट’ गिफ्ट! देशातील पहिल्या एसी Double Decker बसचे लोकार्पण )

१) भुसावळ – देवळाली – भुसावळ

  • ट्रेन क्र.11114 दि. १६ सप्टेंबर २०२२ पासून भुसावळ येथून दररोज १७.३० वाजता सुटेल आणि देवळाली येथे त्याच दिवशी २२.४५ वाजता पोहोचेल.
  • ट्रेन क्र.11113 दि. १७ सप्टेंबर२०२२ पासून देवळाली येथून दररोज ०७.२० वाजता सुटेल आणि भुसावळ येथे त्याच दिवशी १२.१५ वाजता पोहोचेल.

२) भुसावळ – वर्धा – भुसावळ

  • गाडी क्रमांक 11121 दि. १५ सप्टेंबर २०२२ पासून भुसावळ येथून दररोज १४.३० वाजता सुटेल आणि वर्धा येथे त्याच दिवशी २१.०० वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 11122 दि. १६ सप्टेंबर २०२२ पासून दररोज वर्धा येथून ००.०५ वाजता सुटेल आणि भुसावळ येथे त्याच दिवशी ०७.२५ वाजता पोहोचेल.

३) पुणे – सोलापूर – पुणे

  • ट्रेन क्र.11417 दि. १५ सप्टेंबर २०२२ पासून दररोज पुणे येथून २३.०० वाजता सुटेल आणि सोलापूर येथे दुसऱ्या दिवशी ०७.५५ वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 11418 दि. १५ सप्टेंबर २०२२ पासून सोलापूर येथून दररोज ११.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी १९.२५ वाजता पोहोचेल.

४) मिरज – हुबळी – मिरज

  • ट्रेन क्रमांक 17332 दि. २५ ऑगस्ट २०२२ पासून दररोज १०.३० वाजता हुबळी येथून सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी १८.३० वाजता पोहोचेल.
  • ट्रेन क्रमांक 17731 दि. २७ ऑगस्ट २०२२ पासून मिरज येथून दररोज ०६.१० वाजता सुटेल आणि हुबळी येथे त्याच दिवशी १५.०० वाजता पोहोचेल.

५) मिरज – कॅसल रॉक – मिरज

  • ट्रेन क्रमांक 17333 दि. २६ ऑगस्ट २०२२ पासून मिरज येथून दररोज १०.३० वाजता सुटेल आणि कॅसल रॉक येथे त्याच दिवशी १६.३० वाजता पोहोचेल.
  • ट्रेन क्र.17334 दि. २६ ऑगस्ट २०२२ पासून कॅसल रॉक येथून दररोज १७.०० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी २३.४० वाजता पोहोचेल.

६) मिरज – लोंडा – मिरज

  • ट्रेन क्रमांक 07351 एक्सप्रेस विशेष दि. २५ ऑगस्ट २०२२ पासून दररोज १९.१० वाजता मिरज येथून सुटेल आणि लोंडा येथे त्याच दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल.
  • ट्रेन क्र. 07352 एक्सप्रेस विशेष दि. २६ ऑगस्ट २०२२ पासून लोंडा येथून दररोज ०५.०० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी ०९.४५ वाजता पोहोचेल.

वरील सर्व गाड्या मेल/एक्स्प्रेसच्या भाड्यानुसार अनारक्षित म्हणून धावतील. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. असे आवाहन रेल्वेने केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.