पश्चिम महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट कायम; नागरिक हैराण!

114
राज्यात एकीकडे गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस सुरु आहे; तर दुसरीकडे कोल्हापूर सारख्या शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रावरील अवकाळी पावसाचे संकट वाढत चालले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यासह मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रातील १०, मराठवाड्यातील ८ अशा एकूण १८ जिल्ह्यात २३ एप्रिलपर्यंत अवकाळी वातावरणाची शक्यता आहे. तसेच कोकणातील ४ आणि विदर्भातील ११ अशा एकूण १५ जिल्ह्यात अवकाळी पावसाचे वातावरण निवळण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक शहरांमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक नुकसान झाले आहे. नाशिकसह इतर अनेक शहरांतील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. द्राक्ष, आंबा, कलिंगड, कांदा यांसारख्या अनेक पिकांचे अवकाळीमुळे नुकसान झाले आहे. नाशिकमधील जिल्हास्तरीय शाळा देखील अवकाळी पावसाची शिकार झाली आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट वाढत असली तरी सध्याचे तापमान हे सरासरी इतकेच जाणवत आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये या उष्णतेत साधारण तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होवू शकते असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.