नोव्हेंबर अखेरीस झालेला अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपिटीमुळे राज्यातील सुमारे १२ लाख ८७ हजार हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे १,३७९ कोटी रुपयांची भरपाईची मागणी केली आहे.
(हेही वाचा – Marathwada: जालना-मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू होणार, जाणून घ्या तिकिटाचे दर)
राज्य आपत्ती निर्मूलन निधीतून ही भरपाई (Unseasonal Rain) देण्यात येणार असून, याचा लाभ राज्यातील २३ लाख ९० हजार शेतकऱ्यांना होणार आहे. ही मदत लवकरात लवकर मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
(हेही वाचा – Devendra Fadnavis यांच्या मदतीने काठमांडू येथे अडकलेले ५८ भाविक मायदेशी परतले)
राज्यातील २३ लाख ९० हजार ५७१ शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका –
अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपीट झाल्यानंतर तब्बल दीड महिना उलटूनही राज्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे रखडले होते. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कृषी विभागाने तातडीने हा अहवाल पूर्ण करून राज्य सरकारला सादर केला. त्यानुसार राज्यातील १२ लाख ८७ हजार १८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या आपत्तीमुळे राज्यातील २३ लाख ९० हजार ५७१ शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कृषी विभागाने सादर केलेल्या या अहवालानुसार १३७९ कोटी ७७ लाख ७१ हजार रुपयांची मदत (Unseasonal Rain) मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community