Unseasonal Rain : चीनच्या राष्ट्रीय विभागाचा अंदाज ; सोमवारी सर्वात मोठा पूर येण्याची शक्यता  

वादळाच्या पार्श्वभूमीवर २० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे तर पुरामुळे १२ कोटी लोक बाधित होण्याचा अंदाज

295
Unseasonal Rain : चीनच्या राष्ट्रीय विभागाचा अंदाज ; सोमवारी सर्वात मोठा पूर येण्याची शक्यता  

चीनच्या राष्ट्रीय हवामान विभागाने (National Meteorological Department of China) दिलेल्या माहितीनुसार, २१ एप्रिलच्या संध्याकाळी वादळ दक्षिण किनारपट्टीवर धडकू शकते. तसेच चीन (China) येथील वादळाबाबत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर चीनमध्ये सोमवारी मुसळधार पाऊस आणि पुर (china flood) येण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. शनिवारी रात्री ०८ वाजल्यापासून चीनच्या किंगयुआन शहरात सतत पाऊस पडत आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर २० हजार लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. या वादळामुळे चीनमध्ये शतकातील सर्वात मोठा पूर येऊ शकतो, अशी भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या पुरामुळे १२ कोटी लोक बाधित होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Unseasonal Rain)

(हेही वाचा – आम्ही वैयक्तीक टीका केली तर कठीण होईल; Bachchu Kadu यांचा रवी राणांना इशारा

मुसळधार पावसांमुळे शाळा बंद

झओकिंग, शाओगुआन, किंगयुआन आणि जिआंगमेन या शहरांमध्येही वादळाचा प्रभाव दिसून येत आहे. गेल्या १२ तासांपासून येथे मुसळधार पाऊस पडत आहे. संपूर्ण झाओकिंग शहर वीजेविना आहे. पुढील आदेश येईपर्यंत किंगयुआनमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शहरातील मोबाईल सिग्नलही गायब झाले आहेत. ग्वांगडोंगमधील किंगयुआन आणि शाओगुआनमध्ये मदतीसाठी सैन्य पाठवण्यात आले आहे. आज सकाळपासून ग्वांगडोंगमधील २७ हायड्रोलॉजिकल स्टेशन अलर्टवर आहेत. गुआंगडोंगमध्ये पावसासोबतच गारपीटही होत आहे. यापूर्वी जून २०२२ मध्ये येथे पूर आला होता. (Unseasonal Rain)

(हेही वाचा – Love Jihad मध्ये प्राण गमावलेल्या हिंदू मुलीचे वडील काँग्रेसच्या नगरसेवकाची जे.पी. नड्डा यांनी घेतली भेट

बेई नदीला तडाखा 

शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत गुआंग्शीच्या हेझोउ शहरात ६५ भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. तर परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत सरकारने सागरी भागात जाण्यास बंदी घातली आहे. दक्षिण चीनमधील मुख्य नदी असलेल्या बेई नदीला तडाखा बसला असून, सोमवारपर्यंत निवासी भागात पाण्याची पातळी १९ फुटांपर्यंत वाढली आहे. १८ एप्रिलपासून चीनच्या ग्वांगडोंग शहरात मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे पर्ल नदी डेल्टा पाण्याने भरली आहे. पुराचे पाणी अनेक वस्त्यांमध्ये शिरले असून एक मजल्यापर्यंतची घरे पाण्याखाली गेली आहेत. (Unseasonal Rain)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.