Unseasonal Rain : शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंत मदत; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

133
Unseasonal Rain : शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंत मदत; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई, पालघर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात रविवारी (२६ नोव्हेंबर) सायंकाळी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडला. त्यामुळे काही शहरात या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आश्वासन दिले आहे.

अशातच आता राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (२९ नोव्हेंबर) झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, आधी सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे एकत्रित प्रस्ताव सादर झाल्यानंतरच ही मदत दिली जाणार आहे. मात्र, प्रत्यक्ष मदतीची घोषणा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Chhagan Bhujbal यांच्या येवला दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध)

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार

गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये (Unseasonal Rain) अवकाळी पाऊस , गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबद्ध रीतीने एकत्रितरीत्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले.

३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांच्या नुकसानीची भरपाई

तातडीने प्रस्ताव सरकारकडे पाठवापंचनामे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांच्या नुकसानीच्या भरपाईचा (Unseasonal Rain) प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले. पंचनाम्यास चार ते पाच दिवसांचा वेळनुकसानीचे पंचनामे तयार होण्यास आणखी चार-पाच दिवस लागतील. त्यानंतरच नुकसानीची नेमकी आकडेवारी समोर येईल. त्यानंतर मदतीचे सूत्र निश्चित केले जाईल. हे लक्षात घेता हिवाळी अधिवेशनात मदतीच्या घोषणेची शक्यता आहे.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.