ऐन दिवाळी सणाच्या दरम्यान वातावरणात मोठे बदल दिसून येत आहेत. हिवाळ्यामध्ये ढगाळ वातावरण तयार झाले असून देशासह राज्यातील काही भागांमध्ये पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये सध्या पाऊस हजेरी लावत आहे.
बुधवारी, ८ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुण्याच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. गुरुवारीही राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मुंबईतील पश्चिम उपनगर तसेच कल्याण-डोंबिवली येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे शनिवारनंतर राज्यातील हवामान पूर्णपणे निरभ्र होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
(हेही वाचा MHADA : म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३ : दिवाळीपूर्वी १५० यशस्वी पात्र अर्जदारांना ऑनलाइन ताबा पत्र)
Join Our WhatsApp Community