मराठवाड्यात शनिवारीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट झाली. छत्रपती संभाजीनगरच्या करंजखेड आणि पिशोर परिसरात गारपीट झाली. छत्रपती संभाजीनगरसह लातूर, हिंगोल, परभणी जिल्ह्यात देखील शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. ज्वारी, गहू, हरभरा, टरबूज आणि खरबूज यासह आंब्याच्या बागा असलेल्या भागात गारपीट आणि वादळी वाऱ्याने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
परभणीत सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा कहर दिसून आला. शनिवारी दुपारी दोन वाजल्यानंतर परभणी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पुर्णा, सेलु तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाला. तर गंगाखेड, सेलु, सोनपेठ तालुक्यात गारपीटमुळे नुकसान झाले.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर, पानगाव, टाकळगाव, मोहगाव, तळणी गावाच्या शिवारात पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी मध्यरात्रीपासून निलंग्यात पावसाने हजेरी लावली.
(हेही वाचा – प्रशासनाकडून इन्फ्ल्यूएंझा व कोविडबाबत सुरक्षात्मक उपाययोजना जारी)