मुंबईत अवकाळी पाऊस; सीएसटी-कुर्ला हार्बर लाईनचे वेळापत्रक कोलमडले

राज्यात सध्या काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. मात्र आता मुंबईतही अवकाळी पाऊस आला आहे. गुरुवार, १६ मार्च रोजी संध्याकाळी अवकाळी पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली. याचा परिणाम हार्बर लाईनवर परिणाम झाला आहे. सीएसटी-कुर्ला या दरम्यान लोकलचे वेळापत्रक कोलमडले. 
 
सध्या वातावरणात सातत्याने बदल होत आहेत, कधी उकाडा तर कधी थंडी पडत आहे. त्यातच आता पाऊस पडला आला. त्यामुळे मुंबईच्या वातावरणात आणखी बदल झाला आहे. अवकाळी पावसामुळे मुंबईतील वातावरण थंड बनल्यामुळे मुंबईकरांच्या तब्येतीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अवकाळी पावसामुळे दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथे भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जाणता राजा’ या महानाट्यावरही परिणाम झाला आहे. 
 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here