मुंबईत मध्यरात्रीपासून अवकाळी पाऊस

112

मुंबईत काही ठिकाणी बुधवारी मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागात वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे रस्त्यावर पाणी साचले असून वाहनचालकांना ऐन उन्हाळ्यात पावसाळी समस्यांना सामोरे जावा लागत आहे.

( हेही वाचा : उन्हाळ्यात कशी घ्याल आरोग्याची काळजी? ‘या’ पेयाचा करा आहारात समावेश, जाणून घ्या फायदे)

उन्हाळ्यात अवकाळी पावसाला सुरूवात झाली असतानाचं, प्रत्यक्ष मान्सूनच्या ४ महिन्यांदरम्यान स्कायमेटच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह देशभरात अवकाळी पाऊसाचे संकट पाहायला मिळणार आहे. फक्त केरळच्या दक्षिण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील गहू, हरभरा, फळांच्या बागांचे सर्वाधिक नुकसान झाले असून सध्या सरकारकडून शेतीचे पंचनामे केले जात आहेत. दरम्यान आमचे सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आहे आणि आम्ही मदत करत राहू अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी दिली आहे.

उन्हाळ्यात गारपीट का होते?

काही वर्षांपूर्वी गारपीट फक्त पावसाच्या महिन्यांमध्ये होत असायची. गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत गारपीट व्हायला सुरुवात झाली. हवामान शास्त्राच्या परिभाषेत सांगायचे तर गारा पडण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक- हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी आणि दुसऱ्या हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त हवे. अशी परिस्थिती निर्माण झाली की, गारपीट होण्याची शक्यता वाढते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.