Mumbai Rain : मुंबईत मार्च की जुलै? नेटकऱ्यांचा सवाल, ट्विटरवर अनेक व्हिडिओ व्हायरल

84

मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा जरी मिळाला असला तरी नागरिकांची एकच तारांबळ उडाली. सद्यस्थितीत लोकल गाड्या विलंबाने धावत आहेत. तर दोन्ही महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबईत सुद्धा मंगळवारी सकाळी पडलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे.

( हेही वाचा : विधिमंडळाच्या कामकाजावरही पावसाचा परिणाम; आमदारांना पोहोचण्यास उशीर )

मुंबईत मार्च आहे की जुलै?

दरम्यान, या अवकाळी पावसाचे आणि मुंबईत सध्या कसे वातावरण आहे याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यामध्ये मुंबईत मार्च आहे की जुलै असा सवाल नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच पावसावर आधारित काही मीम्स सुद्धा अगदी काही तासातचं व्हायरल झाले आहेत.

अनेक भागात साचले पाणी 

https://twitter.com/HindusthanPostM/status/1638041344248627200

https://twitter.com/ritzk82/status/1637974045143736320

 

भन्नाट मीम्स व्हायरल 

https://twitter.com/vrushv14/status/1638005009723043840

https://twitter.com/Wakchaureprav/status/1638003840434962433

https://twitter.com/Me_Saleel/status/1638001185864167424

हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार येत्या काही तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणेकरांना ऐन मार्च महिन्यात पावसाळी ऋतुचा अनुभव येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.