राजस्थानहून आलेल्या उष्णतेच्या लाटांमुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. काही भागात पाऊस पडत आहे. सातारा (Satara) , सोलापूर (Solapur) , रत्नागिरी (Ratnagiri) आणि कोल्हापूरच्या (Kolhapur) काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी पाऊस, वादळी वारा आणि गाराही पडल्या आहेत. (Unseasonal Rain)
हेही वाचा-BMC : तीन वर्षांपूर्वी २१ लाख रुपयांत खरेदी केलेल्या मिनी कॉम्पॅक्टरसाठी महापालिका आता मोजणार ४५ लाख
पंढरपुरात पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. काही भागात झाडांची पडझड झाल्याचे वृत्त आहे. पुण्यातही रात्री ९ वाजल्याच्या सुमारास विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट सुरु होता. पुणे परिसरातही पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे. (Unseasonal Rain)
हेही वाचा- दोन महिन्यात राज्याचे नाट्यगृहधोरण आणणार; Ashish Shelar यांचे आश्वासन
सातारा जिल्ह्यातही कराड आणि सातारा परिसरात पावसाची रिमझिम पहायला मिळाली. मध्यरात्रीच्या सुमारास कऱ्हाड, मलकापूरसह परिसरात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह सुमारे तासभर पावसाने हजेरी लावली होती. कराड परिसरात दुसऱ्यांदा वळवाचा पाऊस पडला आहे. (Unseasonal Rain)
हेही वाचा- Waqf Bill : शिवसेना उबाठाची पळापळ!
रत्नागिरीतही पावसाने हजेरी लावली, यामुळे आंबा उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आधीच पाऊस उशिरापर्यंत थांबल्याने आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षीपेक्षा २५ टक्केच आंबा तो देखील उशिराने आला आहे. अशातच हा आंबा झाडांवर असताना पुन्हा पाऊस झाल्याने आलेले पिकही वाया जाण्याची शक्यता आहे. (Unseasonal Rain)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community