Unseasonal Rain: अवकाळी पावसाने कुठे किती नुकसान? वाचा सविस्तर

199
Unseasonal Rain: अवकाळी पावसाने कुठे किती नुकसान? वाचा सविस्तर
Unseasonal Rain: अवकाळी पावसाने कुठे किती नुकसान? वाचा सविस्तर

राज्यात एप्रिल महिन्यात अनेक भागांत अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीट सुरु आहे. या पावसामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सलग तिसऱ्या दिवशी पहाटेपासून नागपूरात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला. आज पूर्व आणि पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. (Unseasonal Rain)

कुठे किती नुकसान?

अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये १६३ हेक्टर पिकांचे नुकसान, जालना १३४, परभणी ५०, हिंगोली २९७, लातुर ५०, धाराशिव ३०८, नांदेड ७४९, तर बीडमध्ये सर्वाधिक १०२१ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. (Unseasonal Rain)

हळद उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान

वाशिममधील शिरपूर व परिसरातील जोरदार पाऊस (Unseasonal Rain) पडला. मागील तीन दिवसांत परिसरात दोन वेळा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नाले पूर्णपणे ओसंडून वाहत आहेत. पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांचे ढगाळ वातावरणामुळे (Unseasonal Rain) नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यासह विदर्भ सीमेवर अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. मंठा तालुक्यतील उस्वद गावात वादळी वारा आणि वादळी वाऱ्यामुळे गावातील शाळा आणि घरावरची पत्रे उडून गेली. अचानक झालेल्या या पावसामुळे फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Unseasonal Rain)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.