Unseasonal Rain : उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी पावसाने घेतला ७३ लोकांचा मृत्यू

238
Unseasonal Rain : बिहार आणि उत्तर प्रदेशात (Bihar and Uttar Pradesh) अवकाळी पावसाचा कहर सुरु आहे. एकीकडे तीव्र उष्णता (Heat) तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा कहर असं चित्र देशातील विविध भागात पाहायला मिळत आहे. आता उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यात आणि बिहारमधील काही जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी वीज कोसळल्याच्या (Lightning strikes) घटना घडल्या आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेशात वीज कोसळून आणि वादळ वाऱ्यामुळे (Stormy winds) घडलेल्या घटनांमध्ये ७३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Unseasonal Rain)

(हेही वाचा – ST Employee Salary : एसटी कर्मचाऱ्यांचे उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत मिळणार)

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारीही जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, आसाम, मेघालय येथे ४०-५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहू शकतात. वीज पडण्याची सूचना देखील आहे. तसेच मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवारी उत्तराखंडमधील चमोली येथे ढग फुटले.
देशातही तीव्र उष्णता सुरूच आहे. गुरुवारी बहुतेक राज्यांमध्ये दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सिअस ओलांडले. राजस्थानमधील बारमेर येथे सर्वाधिक ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आजही दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये पारा ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहील. राजस्थान-गुजरातमध्ये ते ४०-४३°C पर्यंत जाऊ शकते. दिल्लीतही पारा ४० अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – IPL vs PSL : पीएसएल ऐवजी आयपीएल निवडल्याबद्दल कॉर्बिन बॉशने मागितली पाक चाहत्यांची माफी)

हवामान खात्याच्या (Department of Meteorology) म्हणण्यानुसार, राजस्थानमधील जैसलमेर-बाडमेर, गुजरातमधील सौराष्ट्र-कच्छ, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, संपूर्ण दिल्ली-एनसीआरमध्ये उष्णतेची लाट राहील. मध्य प्रदेशातील ३० जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसाठी ऑरेंज अलर्ट आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.