अवकाळी पावसानंतर बाजारात विक्रीसाठी आलेल्या आंब्याचे Mango दर चांगलेच घसरले आहेत. १०० रुपये किलो दराने विकला जाणारा आंबा आता ५० रुपये किलो दराने विकला जात आहे. यामुळे मे महिन्यात विरोधाभासी चित्र पाहायला मिळत आहे
उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यात आंबा Mango विकला जातो. शहरात १५० ते २०० गाड्यांवर आंबा विकला जातो. अवकाळी पावसापूर्वी अमरावतीच्या बाजारपेठेत आंब्याला १०० रुपये किलोचे दर होते. मात्र, वादळ वाऱ्याने वेळेपूर्वीच आंबा गळाला. तर आंबा खाली पडल्याने तो शेतकऱ्यांना सुस्थितीत पिकविता आला नाही. हवामान विभागाने वादळ वाऱ्याचा इशारा दिला होता. यामुळे शेतकऱ्यांनी वेळेपूर्वीच आंबा उतरविला. एकाचवेळी हा आंबा बाजारात विक्रीसाठी आला आहे. यामुळे बाजारात आंब्याचे दर घसरले आहेत.
उन्हाळ्यात पावसाचे वातावरण तयार झाल्याने आंब्याच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. यातून आंब्याची Mango विक्री प्रभावित झाली आहे. या सर्व बाबींचा परिणाम आंब्याच्या दरावर झाला आहे. बैगनपल्ली, लालबाग, आणि दशेरी आंब्याचे दर ५० रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. इतर आंब्याच्या दरातही थोडी घसरण नोंदविण्यात आली आहे. आंब्याच्या दरात अचानक झालेल्या घसरणीमुळे आंबा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. याशिवाय विक्री कमी झाल्याने व्यापारीदेखील चिंतेत सापडल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे.
(हेही वाचा Sharad Pawar : चार दिवसांच्या राजीनामा नाट्यावर पडला पडदा; राष्ट्रवादीची ‘पॉवर’ पवारांच्याच हातात)
Join Our WhatsApp Community