सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी सायंकाळी आणि शनिवारी पहाटे अवकाळी पाऊस पडला. वैभववाडी, कणकवली, नांदगाव, कुडाळ आणि आंबोली याठिकाणी हा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. जिल्हयात शुक्रवार पासूनच आकाश मेघाच्छादित आहे. वातावरणातला उष्मा कमालीचा वाढला आहे. या अवकाळीमुळे आंबा, काजू, जांभूळ, कोकम पीक धोक्यात आले आहे. पुढचे पाच दिवस सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
जिल्ह्यात पुढील पाच दिवस सोसाट्याचा वारा विजांचा लखलखाट आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. शुक्रवारी संध्याकाळी तसेच मध्यरात्री सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागात तुरळक तर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, जांभूळ व्यापाऱ्यांना चिंतेचा सावट आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचे परिणाम आंबा, काजू, जांभूळ आदी पिकावर दिसून येऊ शकतात.
शुक्रवारी कुडाळ, कणकवली, नांदगाव, वैभववाडी तर आंबोली या परिसरात पाऊस पडल्यानंतर सद्यस्थिती तापमानात बरीच वाढ झाली असून दिवसभरात ३४ ते ३६ सेल्सिअस एवढे तापमान आहे. ८, ९ आणि १० एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाची पावसाची शक्यता असून ११ एप्रिल रोजी पर्जन्यमान कोरडे राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आला आहे.
(हेही वाचा – बळीराजा संकटात! विदर्भ- मराठवाड्यासह राज्यभरात जोरदार पाऊस, या जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा)
Join Our WhatsApp Community