राज्यभरात दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत परंतु या परीक्षांच्या उत्तपत्रिका तपासणीवर विनाअनुदानित शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे. राज्यातील अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये या उत्तपत्रिका अशाच तपासणीविना पडून आहेत. यामुळे दहावी-बारावीचे निकाल उशिराने लागतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे. जर निकाल उशिरा लागले तर कृती समिती जबाबदार नाही असा इशारा शालेय शिक्षण विभागाला विनाअनुदानित कृती समितीने दिला आहे.
( हेही वाचा : …आणि सोमय्यांनी पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर ठिय्या मारला )
उत्तरपत्रिका तपासणीसाठी सहकार्य करणार नाही
विनाअनुदानित शिक्षकांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन केले आणि मागण्या पूर्ण न झाल्यामुळे उत्तपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. उत्तरपत्रिकांचे गठ्ठे अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये तसेच पडून आहेत. जर शाले शिक्षण मंडळ आमच्या मागण्या गांभीर्याने घेणार नसेल तर आम्ही उत्तरपत्रिका तपासणीसाठी सहकार्य करणार नाही असे विनाअनुदानित कृती समितीचे अध्यक्ष संजय डावरे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान शासनाला आमची खरच काळजी असेल तर मागण्या मान्य कराव्यात अन्यथा कार्यालयासमोरच आंदोलन केले जाईल याची नोंद घ्याली असा इशाराही सहकार्य विनाअनुदानित कृती समितीने दिला आहे. विनाअनुदानित शिक्षक आपल्या मागण्यांवर ठाम असल्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community