Unwanted Calls चा मारा, सामान्यांना ताण सारा !

109
Unwanted Calls चा मारा, सामान्यांना ताण सारा !

सध्या दिवाळीच्या उत्साहातच विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरून झाले असून प्रचारासाठी उमेदवारांसह पक्षांच्या नेत्यांचे कॉल वाढले आहेत. नागरिक मोबाइलवर येणाऱ्या ‘अनवाँटेड कॉल्स’ला वैतागले आहेत. चालू कामात व्यत्यय या माध्यमातून येत असून डोकेदुखी वाढली असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. हातातील काम सोडून हे रिकामे कॉल नागरिकांना रिसिव्ह करावे लागत असल्याने लोकांच्या कामात खोळंबा होत आहे. (Unwanted Calls)

गृहिणीदेखील या सतत येणाऱ्या कॉल्सला वैतागल्या आहेत. त्यामुळे महिलांमध्ये चिडचिडेपणा वाढीस लागला आहे. दिवाळीच्या हंगामात क्रेडिट कार्ड ऑफर ऑनलाइन क्लासेस, डिश कंपन्या ऑफर, विविध प्रकारचे प्रलोभन, ऑनलाइन साईट्स अशा विविध कंपन्यांचे कॉल्स सातत्याने येत असतात. दिवसभरात किमान एकाच व्यक्तीला दहा ते पंधरा कॉल सहज येतात. (Unwanted Calls)

(हेही वाचा – Wriddhiman Saha Retires : वृद्धिमान साहाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती)

अनोळखी नंबर असल्याने आपला कोणी नातेवाईक किंवा मित्र किंवा कोणी ओळखीचा असेल किंवा आपलाच विद्यार्थी असेल म्हणून कॉल उचलला जातो; मात्र क्रेडिट कार्डवर ऑफर आहे, तुम्हाला लोन हवे आहे का? डिशवर ही ऑफर, ती ऑफर, तुम्हाला लोन मंजूर झाले आहे. आमच्या ऑनलाइन क्लासेसमध्ये तुम्ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता, अशा विविध प्रकारच्या नको असलेल्या कॉल्सला नागरिक प्रचंड वैतागले आहेत. या अनवाँटेड कॉल्सला वेळेचे बंधन नाही. सकाळ ते रात्रीपर्यंत केंव्हा ही ते फोन येऊन धडकतात त्यामुळे दुपारची वामकुक्षी हरवली आहे. (Unwanted Calls)

चालू कार्यालयीन कामात, घरकामात, शेतात काम चालू असताना, वाहन चालविताना हे मानसिक त्रास देणारे कॉल सातत्याने येत आहे. त्यातच भरीत भर म्हणजे काही उमेदवारांचे ही फोन मलाच मतदान करा हे सांगण्यासाठी वाजत राहतात हे विशेष. दिवसभरातून पाच ते सहा वेळा वाजते रिंग सोमवारी नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र अर्ज दाखल केल्याच्या दिवसापासूनच नागरिकांच्या मोबाईलवर दिवसभरातून पाच ते सहा वेळा उमेदवारांच्या प्रचाराची रिंग वाजते. अशावेळी नाहकच मनस्तापही मतदारांना सहन करावा लागत आहे. निवडणूक काळातला हा अनुभव अनेकांना आता घडत आहे. (Unwanted Calls)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.