धक्कादायक! ISI च्या पैशावर उत्तर प्रदेशातील १ हजार हिंदूंना बनवले मुसलमान! 

मूकबधिर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी, विवाह यांसारखी खोटी प्रलोभने दाखवून या मौलवींनी येथील मूकबधिरांचे मुस्लिम धर्मात धर्मांतर केले.

93

पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयसह काही विदेशी संस्थांच्या पैशाच्या जोरावर उत्तरप्रदेशातील तब्बल १ हजार हिंदूंचे मुस्लिम धर्मात धर्मांतर करण्यात आले आहे, या प्रकरणी एटीएसने लखनऊ येथून २ मौलानांना यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महिला आणि मूकबधिरांना लक्ष्य केले!

एटीएसने अटक केलेल्या या दोन मौलानांपैकी एकाचे नाव जहांगीर आणि दुसऱ्याचे नाव उमर गौतम असे आहे. हे दोघे जण लखनऊमधील एका मोठ्या मुस्लिम संघटनेशी संबंधित आहेत. एटीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे मौलाना गरीब हिंदूंना लक्ष्य करायचे. आतापर्यंत त्यांनी तब्बल एक हजार हिंदूंचे धर्मांतर केले, त्यामध्ये मोठ्या संख्येने मूकबधिर आणि महिलांचा समावेश आहे. गौतमबुद्ध नगर, सेक्टर ११७ येथील मूकबधिर सोसायटी नोएडा सेंटर येथे मूकबधिरांची शाळा आहे. तसेच अन्य मूकबधिर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी, विवाह यासारखी खोटी प्रलोभने दाखवून या मौलवींनी येथील मूकबधिरांचे मुस्लिम धर्मात धर्मांतर केले.

(हेही वाचा : विनाकारण त्रासापासून मुक्त होण्यासाठी सेना सरनाईकांच्या पाठिशी! संजय राऊतांचा विश्वास )

अशी झाली अटक!

मोटिवेशनल थॉटद्वारे हे दोन मौलाना मुसलमान हिंदूंचे धर्मांतर करायचे. एटीएसचे पथक या दोन मौलानांची चार दिवस चौकशी करून पुरावे गोळा करत होते. त्यावेळी त्यांना धर्मांतराच्या कामासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय सह अन्य विदेशी संस्था त्यांना आर्थिक मदत करीत होत्या, अशी माहिती हाती लागली. दोन्ही मौलाना ‘दावा इस्लामिक सेंटर’ नावाची संस्था चालवतात. 3 जून रोजी दिल्लीच्या दासना मंदिरात दोन मुस्लिम मुलांनी पुजाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्या दोघांनाही पकडल्यानंतर मौलाना उमर आणि जहांगीर यांच्याविषयी माहिती मिळाली. त्यानंतर एटीएसने या मौलानांच्या विरोधात फासे आवळले. हे दोघेही पश्चिम यूपीमधील रहिवासी आहेत. या दोघांच्या विरोधात गौतमी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या जिल्ह्यामंध्ये केले धर्मांतर! 

या मौलानांनी नोएडा डेफ सोसायटीतील मूक-बधिर शाळेतील विद्यार्थ्यांना आमिष दाखवून आणि प्रलोभन देऊन धर्म परिवर्तन करून घेतले. धर्मांतर झालेल्या झालेल्या एक हजार महिला आणि मुलांची यादी प्राप्त झाली आहे. कानपूर, वाराणसी आणि नोएडा येथील अनेक मुले व स्त्रिया यांचेही धर्मांतर झाले आहे. कानपूरमधील मुलाला दक्षिणेकडील शहरात नेण्यात आले आहे. एसटीएस त्याचा शोध घेत आहे. रामपूरमधील एका गावात दोन हिंदू मुलांची जबरदस्ती सुंता करुन धर्मांतर करण्यामध्ये आंणखी एका मौलानाचा हात असल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा : कोरोनात योग आशेचा किरण ठरला! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.