यूपीच्या उन्नावमध्ये बस अपघातात (Up bus accident) 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात बिहारमधील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मोतिहारी येथील एकाच कुटुंबातील 6 जणांचा समावेश आहे, तर 2 जण जखमी आहेत. हे सर्वजण फेनहारा पूर्व भागातील रहिवासी आहेत. हे कुटुंब साबीर मास्तर यांच्या कुटुंबातील होते. हे सर्वजण मेरठमध्ये मजूर म्हणून काम करत होते. शिवहर येथून काल (9 जुलै) दुपारी एकच्या सुमारास सर्वांनी बस पकडली होती. असे सांगितले जात आहे की जे लोक मरण पावले ते सर्व आधी ट्रेनने जाणार होते, पण तिकीट मिळाले नाही. त्यामुळे या लोकांनी बस पकडली आणि उन्नावमध्ये आग्रा-दिल्ली एक्स्प्रेस वेवर अपघात झाला. (Up bus accident)
(हेही वाचा –ISRO शास्त्रज्ञांनी तयार केला समुद्राखालील रामसेतूचा नकाशा!)
फेनहारामध्ये सध्या दुःखाचे वातावरण आहे. अपघाताची माहिती मिळताच कुटुंबातील इतर सदस्य घटनास्थळी रवाना झाले. इलियास (35), त्याची पत्नी कमरुनेशा (30), अश्फाक (45), त्याची पत्नी मुंचुन खातून (38) आणि त्यांची दोन मुले गुलनाज (13) आणि सोहेल (3) अशी मृतांची नावे आहेत. अश्फाक यांची दोन मुले दिलशाद आणि साहिल जखमी आहेत. इलियास आणि अश्फाक हे दोन्ही भाऊ होते. (Up bus accident)
(हेही वाचा –Andheri Flyover : पश्चिम द्रुतगती मार्गावरील अंधेरी उड्डाणपूल अधांतरीच, नक्की पूल कुणाच्या ताब्यात?)
याच अपघातात लगतच्या इजोर बारा गावातील 3 जण जखमी झाले आहेत. येथे फुल मोहम्मदचे दोन्ही पाय कापण्यात आले आहेत. त्यांनीच फोन करून अपघाताची माहिती कुटुंबीयांना दिली. मात्र, नंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. त्यांच्यासोबत त्याच गावातील आणखी दोन लोक होते. या अपघातात शिवहर येथील दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघे एकाच कुटुंबातील आहेत. दीपक कुमार (27, रा. ब्लॉक रोड) आणि शिवदयाल (28, रा. लालगढ छावणी) अशी मृतांची नावे आहेत. (Up bus accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community