UP Hathras Satsang Stampede: हाथरस येथील सत्संगात मोठी दुर्घटना; चेंगराचेंगरीत १०७ भविकांचा मृत्यू 

180
UP Hathras Satsang Stampede: हाथरस येथील सत्संगात मोठी दुर्घटना; चेंगराचेंगरीत १०७ भविकांचा मृत्यू 
UP Hathras Satsang Stampede: हाथरस येथील सत्संगात मोठी दुर्घटना; चेंगराचेंगरीत १०७ भविकांचा मृत्यू 

UP Hathras Satsang Stampede: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हाथरस येथे मोठी दुर्घटना घडली आहे. चेंगराचेंगरी (Hathras Stampede) होऊन १०७ भविकांचा मृत्यू झाला आहे. सत्संगात चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली असून शंभरहून अधिक भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (UP Hathras Satsang Stampede)

मिळालेल्या माहितीनुसार, भोले बाबांचा सत्संग (Bhole Baba Satsang Hathras) कार्यक्रम सुरु होता यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील रतिभानपूर येथे ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. या सत्संगाचा समारोप कार्यक्रम सुरु होता. यावेळी ही दुर्घटना घडली आहे. संबंधित दुर्घटनेत मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या दुर्घटनेट मृतांमध्ये लहान मुलांसह महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणावर होता.   (UP Hathras Satsang Stampede)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी या घटनेची दखल घेतली आहे. सीएम योगी यांनी मृतांबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना ताबडतोब रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद गतीने करण्याचे निर्देश दिलेत. तसेच मुख्य सचिव मनोज कुमार सिंह आणि डीजीपी प्रशांत कुमार हाथरसला रवाना झाले आहेत. (UP Hathras Satsang Stampede)

(हेही वाचा – एक वर्षात पीएम किसान योजनेत २० लाख ५० हजार लाभार्थींची वाढ; Dhananjay Munde यांचा दावा)

भोले बाबाचा प्रवचनाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी

हातरस येथील सिकंदरराव कोतवाली भागातील फुलराई गावात भोले बाबाचा प्रवचनाचा कार्यक्रम सुरू होता. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने एकच गोंधळ उडाला. एका अंदाजानुसार १ लाख २५ हजारांच्या घरात भाविक या सत्संगसाठी आले होते. गर्दीमुळे लोकांचे हाल होऊ लागले. उन्हामुळे लोक बेशुद्ध झाले आणि नंतर चेंगराचेंगरी झाली. लोक जमिनीवर पडले तेव्हा इतर लोक त्यांना चिरडून बाहेर येऊ लागले. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शेकडो गंभीर लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (UP Hathras Satsang Stampede)

(हेही वाचा –राहुल गांधींचे लोकसभेतील भाषण म्हणजे बालिश कृत्य, बालक बुद्धी; PM Narendra Modi यांची जोरदार फटकेबाजी  )

मृतांच्या नातेवाईकांना २ लाखाची मदत 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हातरस चेंगराचेंगरीतील मृतांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. २४ तासांत चौकशी अहवाल मागवला आहे. कार्यक्रम आयोजकांवर एफआयआर दाखल करून मोठी कारवाई करण्याच्या तयारीत प्रशासन आहे. (UP Hathras Satsang Stampede)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.