पूर्वी हृदयविकाराचा झटका (Heart attack News) साधारणतः वयाची साठी उलटल्यानंतर यायचा, मात्र आता अगदी तरुण वयातही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतात हार्ट अटॅकचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. करोना काळ संपल्यानंतर हार्ट अटॅक येण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. उत्तर प्रदेशमधून (UP News) अशीच एक घटना समोर आली आहे. अवघ्या 7 वर्षांच्या चिमुकलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
हेही वाचा-बुलढाण्यात Hit and Run ; तीन तरुण जागीच ठार
उत्तर प्रदेशातील बागपत येथे एका सात वर्षांच्या मुलीला शाळेत खेळता खेळता जीव गमवावा लागला. अपेक्षा असे या मृत मुलीचे नाव असून ती इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात नेला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच मुलीचे मामा शाळेत पोहोचले आणि त्यांनी तातडीने मुलीला रुग्णालयात दाखल केले मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोस्टमार्टममध्ये मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (UP News)
हेही वाचा-Delhi Bomb Threat : दिल्लीच्या शाळांना सलग दुसऱ्या दिवशी धमकीचा मेल; पोलिस यंत्रणा अॅक्शन मोडवर
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बरौत कोतवाली परिसरातील बिजरौली गावात ही मुलगी तिच्या आजोबांच्या घरी राहत होती. गुरुवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली. 11 वाजण्याच्या सुमारास ती शाळेच्या ग्राऊंडवर आपल्या मैत्रिणींसोबत खेळत होती. खेळत असताना अचानक मुलीच्या छातीत दुखू लागल्याने ती बेशुद्ध पडली. पोस्टमार्टममध्ये मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (UP News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community