ज्ञानवापी संकुलातील वादानंतर आता नवीन वाद समोर आला आहे. वक्फ बोर्डाने वाराणसातील उदय प्रताप कॉलेज (Udai Pratap Autonomous College) (यूपी कॉलेज) ही आपली मालमत्ता असल्याचा दावा केला आहे. वक्फ बोर्डाचे (Waqf Board) सहा वर्षांपूर्वीचे पत्र व्हायरल झाले असून दि. २९ नोव्हेंबर रोजी नमाजाकरिता ५०० हून अधिक लोक उदय प्रताप कॉलेज आवारात जमले. याचं उदय प्रताप कॉलेजच्या (Udai Pratap Autonomous College) आवारात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी नवे विद्यापीठ सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.(Waqf Board)
( हेही वाचा : Jammu and Kashmir मधील दहशतवाद्यांची रणनीती बदलली, परदेशी दहशतवादीही लपल्याची माहिती)
उदय प्रताप कॉलेजच्या आवारात एरव्ही २० ते २५ लोक नमाज अदा करायला येतात. पण दि. २९ नोव्हेंबरला झुंबड उडाल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. आवारात पोलिसांचा कडक बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दि. २५ नोव्हेंबरला योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी कॉलेजच्या (Udai Pratap Autonomous College) ११५ व्या पायाभरणी समारंभाला उपस्थिती दर्शवली. त्यावेळी महाविद्यालयाचे रुपांतर विद्यापीठात करण्याची घोषणा योगी यांनी केली. शंभर एकरातील उदय प्रताप कॉलेजच्या परिसरात ३ बिघे जमिनीत नवाब टोंकची मशीद आणि कचनार शाह यांची कबर आहे. (Waqf Board)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community