उन्नाव (Unnao) जिल्ह्यातील औरस पोलिस स्थानकाच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी १९ वर्षीय हिंदू विद्यार्थिनी उपासना हिचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. धर्मांध तौहिद अली हा उपासनाचा पूर्वीचा प्रियकर होता. दि. १० फेब्रुवारी रोजी आरोपीने उपासनाला तल्ही गावातील जंगलात भेटीसाठी बोलवले होचे. तिथे त्यांचे भांडण झाल्यानंतर आरोपी तौहिद अली याने उपासनाचा गळा दाबून आणि चाकूने गळा चिरून हत्या केली. दि. २० फेब्रुवारी रोजी पोलिसांनी तौहिदला चकमकीनंतर अटक केले आहे. तौहिदच्या (Tauhid Ali ) पायाला गोळी लागली असून त्याचा तपास सुरु आहे.
( हेही वाचा : नाशिकमध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधामुळे प्रशासनाने २५ वर्षांपूर्वीचा अनधिकृत Dargah केला जमीनदोस्त)
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, उपासनाचे वडील हृदयनारायण गौतम (Hridaynarayana Gautam) हे होमगार्ड आहेत. दि. १० फेब्रुवारी रोजी उपासना तिच्या इंटरमिजिएटच्या परीक्षेसाठी बाहेर पडली पण ती घरी परतलीच नाही. वडिलांनी दि. १२ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. जंगलात पीडित विद्यार्थीनीची बॅग, ओळखपत्र, बूट आणि कापलेला हात सापडला. दुसऱ्या दिवशी डोके आणि बरगड्यांचा सांगाडा सापडला. पोलिसांचे म्हणणे आहे की, वन्य प्राण्यांनी मृतदेहावर ओरखडे काढले होते, त्यामुळे शरीराचे अवयव वेगळे आढळले. (Tauhid Ali )
तौहिदने (Tauhid Ali ) कबूल केले की त्याचे उपासनावर प्रेम होते. त्याने त्याला फोनही दिला. पण जेव्हा उपासनाने चंदीगडच्या (Chandigarh) प्रदीप नावाच्या तरुणाचा फोटो व्हॉट्सअॅपवर पोस्ट केला. तेव्हा तौहीदला संशय आला. १० फेब्रुवारी रोजी त्याने उपासनाला जंगलात बोलावले. त्या दिवशी उपासना तिच्या धाकट्या बहिणीसोबत होती. तौहीदने दोघांनाही बाईकवर बसवले, पण गावापूर्वी त्याने उपासनाच्या बहिणीला सोडले आणि उपासनाला जंगलात घेऊन गेला. तिथे त्याने सुरुवातीला तिचा गळा दाबला आणि नंतर चाकूने तिचा गळा चिरून तिची हत्या केली. यानंतर तो मृतदेह तिथेच सोडून पळून गेला.
हत्येनंतर, तौहीद (Tauhid Ali ) त्याच्या गावी परतला. त्याच्या वहिनीला त्याच्या कपड्यांवर रक्त दिसले आणि तिला संशय आला. उपासनाच्या आईने तौहीदच्या नंबरवर फोन केला तेव्हा वहिनीने फोन उचलला. त्याने सांगितले की, तौहीदचे (Tauhid Ali ) कपडे रक्ताने माखले होते आणि त्याने उपासनाच्या कुटुंबाशी झालेल्या भांडणाबद्दल सांगितले. पण वहिनी गप्प राहिल्या. त्यानंतर तौहीद (Tauhid Ali ) हैदराबादला (Hyderabad) त्याचा भाऊ तौसिफकडे गेला. तो दि. १५ फेब्रुवारी रोजी गावात परतला आणि पोलिसांना त्याची माहिती मिळाली.
दि. २० फेब्रुवारी रोजी जंगलात उपासनाचे काही अवयव सापडले. त्याच रात्री पोलिसांनी तपासणी दरम्यान तौहीदला (Tauhid Ali ) पकडले. त्याने पोलिसांवर गोळीबार केला आणि पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांचे म्हणणे आहे की, तौहीदने उपासनाला काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ दाखवून जंगलात येण्यास भाग पाडले होते. उपासनाच्या आईला प्रेमप्रकरणाची जाणीव होती. आता पोलिस प्रदीपचीही चौकशी करत आहेत.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community