देशात पहिल्यांदाच होणार ऑनलाईन जनगणना, अमित शहांची मोठी घोषणा

देशातील सर्वच सरकारी कारभार अद्ययावत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येत आहे. देशातील नागरिकांची मोजणी करण्यासाठी करण्यात येणारी जनगणनासुद्धा आता डिजिटल पद्धतीने करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. आगामी जनगणना ही ई-जनगणना असेल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. यामुळे जनगणना अधिक शास्त्रशुद्ध आणि अचूक होण्यास मदत होईल, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः तुमच्या खिशातली नाणी कुठून आली आहेत, हे कसं ओळखाल? ही आहे ‘ट्रिक’)

अमित शहांची घोषणा

गुवाहटीमधील अमीगाव येथे जनगणना केंद्राचे उद्घाटन करताना शहा यांनी ही घोषणा केली आहे. या ई-जनगणनेचे अनेक फायदे असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. ई-जनगणनेनुसार नोंदणी झाल्यामुळे व्यक्तीची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपोआपच त्याचे नाव मतदार यादीत जोडण्यात येणार आहे.तसेच व्यक्तीला आपले नाव आणि पत्ता बदलणे देखील सोपे होणार असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः या बँकेच्या 600 शाखा बंद होणार, तुमचे अकाऊंट इथे आहे का?)

हे होणार फायदे

  • ई-जनगणनेमुळे जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीला देखील जनगणनेसोबत जोडण्यात येणार आहे.
  • यामुळे जन्म झालेल्या व्यक्तीचे नाव आपोआप जनगणनेच्या यादीत समाविष्ट होईल.
  • तर व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे नाव या यादीतून वगळण्यात येईल.
  • यामुळे भारताची जनगणना सातत्याने अपडेट आणि अद्ययावत होत राहील.

आगामी जनगणना ही येणा-या 25 वर्षांच्या धोरणांना आकार देणारी असेल, असे शहा यांनी म्हटले आहे. या ई-जनगणनेचे सॉफ्टवेअर लाँच होताच मी आणि माझं कुटुंब सर्वप्रथम ऑनलाईन तपशील भरणार असल्याची माहितीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे.

(हेही वाचाः रेपो रेट वाढला की सर्वसामांन्यांची कर्ज का महागतात? वाचा सोप्या शब्दांत)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here