मुंबईकरांसाठी अपडेट : लोकलच्या तिन्हीं मार्गावर असणार ‘Megablock’ 

मुंबईत लोकलच्या मध्य, पश्चिम व हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक पाहावे लागणार आहे.

216
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबईकरांनो ऐन सुट्टीच्या दिवशी घराबाहेर जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रविवार आणि मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नसणार हे होऊच शकत नाही. जर तुम्ही सुट्टीच्या दिवशी बाहेर जाणार असाल दोन-तीन वेळेस विचार करा आणि मगच घराबाहेर पडा कारण ही तसच आहे. रविवारच्या निमित्ताने लोकल रेल्वेने (Local Railway) आपल्या तिन्ही मार्गांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. लोकल रेल्वेच्या पश्चिम मध्यची लाईन आणि हार्बर या तीनही उपनगरीय मार्गावर मेंटेनन्स ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कोणत्या मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक आहे, त्या संबंधित  सविस्तर माहितीवर एकदा नजर टाकुयात. (megablock)

मध्य रेल्वे (Central Railway)

मध्य रेल्वे माटुंगा आणि मुलुंड अप आणि डाऊन फास्ट लाईनवर सकाळी ११.१० ते दुपारी ०३:१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळ १०:२५ ते दुपारी ०२:४५ पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद सेवा माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ठाण्याच्या पुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, सकाळी १०:५० ते दुपारी ०३:०८ वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप फास्ट सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. दोन्ही दिशेने गाड्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा धावणार आहेत.  (megablock)

(हेही वाचा – Trees Poisoning Case : जाहिरात कंपनीला रेल्वेकडून ‘ना हरकत पत्र’, मात्र गुन्हेगार सापडत नाही)

हार्बर मार्ग (Harbour Line)

हार्बर मार्गावर, कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११:१० ते दुपारी ०४:१० वाजेपर्यंत कोणतीही लोकल रेल्वे धावणार नाही. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल वाशी या भागांवर विशेष रेल्वे चालवल्या जातील. तसेच हार्बर मार्गावरवरील प्रवाशांना रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ०६ या वेळात ठाणे -वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी आहे.  

पश्चिम रेल्वे (Western Railway)

पश्चिम मार्गावर ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड वायरींच्या देखभालीचे काम हाती घेण्यात येणार आहे. तर सांताक्रूझ आणि गोरेगांव स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १० ते दुपारी ०३ पर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गावर ०५ तासांचा जंबोब्लॉक घेण्यात येणार आहे. (megablock)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.