आता डेबिट किंवा एटीएम कार्डशिवाय यूपीआयद्वारे एटीएममधून पैसे काढता येणार आहेत.भारतातील पहिले UPI ATM लाँच झाले आहे. हिताची लिमिटेडची उपकंपनी असलेल्या हिताची पेमेंट सर्व्हिसेसने UPI ATM लाँच केले आहे.
ही सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला क्रेडिट आणि डेबिट कार्डची गरज भासणार नाही. याच्या मदतीने तुम्ही कार्डशी संबंधित फसवणुकीपासूनही सुरक्षित राहाल, कारण तुम्हाला येथे कोणताही कार्ड नंबर किंवा पिन नंबर टाकण्याची गरज नाही.
भारतातील लोकांना ही सुविधा देण्यासाठी, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या सहकार्याने UPI ATM चे व्हाईट लेबल एटीएम (WLA) सुरू करण्यात आले आहे.तुम्हाला UPI ATM वर कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा मिळेल, फरक एवढाच असेल की येथे OTP ऐवजी तुम्ही UPI अॅपवरून फक्त QR कोड स्कॅन करून पैसे काढू शकाल.
(हेही वाचा : CPCB: ‘पीओपी’वर पुढील वर्षी पूर्ण बंदी? मुंबई महापालिकेचे प्रतिज्ञापत्रातून संकेत)
अशी आहे UPI ATM वापरण्याची पद्धत
- UPI एटीएम सामान्य एटीएमपेक्षा लहान आहे. यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर Welcome to UPI ATM लिहिलेले दिसेल.
- स्क्रीनवर क्लिक केल्यावर तुम्हाला किती रक्कम काढायची आहे हे विचारले जाईल. यावर 100, 500, 1,000 रुपयांचे टॅब दिसतील.
- तुम्हाला किती पैसे काढायचे आहेत त्यावर क्लिक करा, स्क्रीनवर QR कोड दिसेल.
- तुम्ही BHIM, PhonePe, GPay सारख्या कोणत्याही UPI अॅपवरून हा कोड स्कॅन करु शकता.
- आणि नंतर तुमच्या फोन स्क्रीनवर तुम्हाला तुमचे बँक खाते निवडण्यास सांगितले जाईल.
- यानंतर तुम्हाला स्क्रीनवर विचारले जाईल – ‘Confirm to withdraw cash’, वर क्लिक करा.
- आता यानंतर तुम्हाला तुमच्या UPI अॅपचा पिन टाकावा लागेल आणि त्यानंतर एटीएम स्क्रीनवर एक प्रोसेसिंग अलर्ट दिसेल आणि त्यानंतर रोख रक्कम तुम्हाला मिळेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community