- ऋजुता लुकतुके
युपीआय क्रेडिट कार्ड म्हणजे सोप्या भाषेत तुमचं क्रेडिट कार्ड युपीआय प्रणालीशी जोडणं. म्हणजेच एरवी युपीआयच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करताना हा व्यवहार युपीआय खात्याशी जोडलेल्या बँक खात्यातून होत असतो. तोच व्यवहार आता युपीआय क्रेडिट कार्डाद्वारे होईल. तुमचं क्रेडिट कार्ड युपीआयशी जोडलेलं असेल. त्यामुळे क्युआर कोड किंवा फोन नंबरच्या सहाय्याने युपीआयमधून तुम्ही क्रेडिट कार्डही वापरू शकणार आहात. सप्टेंबर २०२२ मध्येच एनपीआयसीने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रुपे क्रेडिट कार्ड सुरुवातीला युपीआयशी जोडता येत होती. (UPI Credit Card)
युपीआयमधून केलेला व्यवहार इथे बँक खात्यावर नाही तर क्रेडिट कार्डावर जमा होतो. युपीआयसाठी बँक खाते जोडणीचा पर्याय अजूनही उपलब्ध आहेच. त्यातच आता क्रेडिट कार्डाची भर पडली आहे. क्रेडिट कार्ड युपीआयला जोडण्याचे फायदे आधी बघूया, (UPI Credit Card)
(हेही वाचा – रेरा घोटाळ्यात फसवणूक झालेल्या कल्याण-डोंबिवलीतील ग्राहकांना न्याय द्यावा; भाजपाचे आमदार Niranjan Davkhare यांची मागणी)
- सर्व ठिकाणी खासकरून, ग्रामीण भागात क्रेडिट कार्डासाठी लागणारी पीओएस यंत्र उपलब्ध नसतात. पण, तुमच्याकडे क्युआर कोड किंवा अगदी मोबाईल फोन असेल तरी युपीआय सुविधा उपलब्ध असतेच. तेव्हा मोबाईल वापरूनही युपीआयच्या माध्यमातून तुम्ही क्रेडिट कार्डावर व्यवहार करू शकता.
- तुम्हाला पहिला व्यवहार करण्यापूर्वी एकदाच तुमचं क्रेडिट कार्ड युपीआयशी जोडायचं आहे. एकदा का ते जोडलं गेलं की, पुढे काही सेकंदांत तुम्ही युपीआयवर क्रेडिट कार्ड वापरू शकाल. हे सुटसुटीत आणि सोपं आहे.
- युपीआय क्रेडिट कार्ड वापरताना तुमचा कुणाशीही प्रत्यक्ष स्पर्श होत नाही. कोव्हिड नंतरच्या काळात या गोष्टीलाही महत्त्व प्राप्त झालं आहे. तुमचं क्रेडिट कार्डही तुम्हाला कुणाला द्यावं लागत नाही. त्याचा गैरवापरही टळतो.
- युपीआयचा वापर सर्रास होतो आणि त्यावर तुम्हाला विविध सवलतींबरोबरच रिवॉर्डही मिळत असतात. त्याचा फायदा तुम्हाला क्रेडिट कार्डाच्या वापरावरही घेता येतो. (UPI Credit Card)
(हेही वाचा – Ind vs Aus, Brisbane Test : ‘तुझे सगळे क्रिकेटचे फटके खिशात घालून ठेव’; गावस्करांनी शुभमन गिलला का सुनावलं?)
क्रेडिट कार्ड युपीआयला कसं जोडायचं?
तुम्ही तुमच्याकडे असलेलं क्रेडिट कार्ड गुगलपे, फोनपे, पेटीएम अशा कुठल्याही युपीआय ॲपला जोडू शकता. ते जोडण्याची पद्धत प्रत्येक बँकेची काहीशी वेगळी आहे. पण, तुमच्या कार्डाची माहिती दिल्यानंतर ही सुविधा सुरू करता येते. तुम्हाला तुमचा सीव्हीव्ही द्यावा लागतो आणि तो दिल्यावर क्रेडिट कार्डाशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला एक ओटीपी येतो. तो टाकल्यावर ही जोडणी प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर युपीआय वापरताना बँक खातं आणि क्रेडिट कार्ड खातं यातील क्रेडिट कार्डाचा पर्याय निवडल्यावर तुम्ही हवा असलेला व्यवहार करू शकाल. (UPI Credit Card)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community