अनेक जण वस्तू खरेदी किंवा देवाण घेवाण करण्यासाठी ऑनलाईन पेमेंटसचा वापर करत असतात. मात्र, देशभरात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) (UPI Down) सेवा पुन्हा एकदा बंद पडली आहे. गेल्या दीड तासापासून नागरिकांना यूपीआयद्वारे व्यवहार करताना अडचणी येत आहेत. ही समस्या गेल्या एका महिन्यात दुसऱ्यांदा उद्भवली आहे. (UPI Down)
यापूर्वी २६ मार्च रोजी सुद्धा यूपीआय सेवा सुमारे अडीच तास ठप्प झाली होती. (UPI Down) त्यावेळी गुगल पे, फोनपे, पेटीएमसारख्या अॅप्सवर व्यवहार अयशस्वी होत होते. तसेच, १० पेक्षा अधिक बँकांच्या यूपीआय आणि नेट बँकिंग सेवांवर परिणाम झाला होता. अनेक वापरकर्ते अॅप लॉगिन आणि नेट बँकिंग प्रवेशही करू शकले नव्हते. (UPI Down)
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने याप्रसंगी स्पष्टीकरण दिले होते की, काही तांत्रिक कारणांमुळे यूपीआय सेवांमध्ये अंशतः अडथळा निर्माण झाला होता. मात्र, समस्या तातडीने सोडवून सेवा पूर्ववत करण्यात आली होती. सध्या सुरू असलेल्या अडचणींबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. वापरकर्त्यांनी संयम ठेवावा, अशी सूचना करण्यात येत आहे. (UPI Down)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community