- ऋजुता लुकतुके
मार्च २०२४ च्या तुलनेत एप्रिल २०२४ मध्ये युपीआयवरून (UPI) झालेल्या व्यवहारांचं प्रमाण काहीसं कमी झालं आहे. एप्रिलमध्ये युपीआयच्या माध्यमातून १९.६४ लाख कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले. हेच प्रमाण मार्च महिन्यात १९.७८ लाख रुपये इतकं होतं. या व्यवहारांचा आकडा बघितला तर मार्चमध्ये १३.४० दशलक्ष युपीआय व्यवहार झाले होते. ते प्रमाण एप्रिल महिन्यात १३.३० दशलक्षांवर आलं. (UPI Transactions)
पण, गेल्यावर्षीच्या एप्रिलमध्ये झालेले युपीआय व्यवहार (UPI Transactions) बघितले तर यात ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. (UPI Transactions)
युनिफाईड पेमेंट सिस्टिम ही प्रणाली आता भारताबाहेरही विस्तारतेय. श्रीलंका, मॉरिशस, फ्रान्स, नेपाळ आणि भूतानमध्येही युपीआय वापरता येतं. तर अलीकडेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नामिबियामध्येही युपीआय (UPI) सदृश प्रणाली विकसित करण्यासाठी करार केला आहे. (UPI Transactions)
NPCI International is thrilled to announce its partnership with Bank of Namibia to support them in developing a UPI-like real-time payment system in the African nation.
This marks our first-ever collaboration with a central bank to deploy UPI Stack in an international market.… pic.twitter.com/qoBNsQgiBh— NPCI (@NPCI_NPCI) May 2, 2024
(हेही वाचा – IPL 2024 Nitish Kumar Reddy : सनरायझर्स हैद्राबादचा नवीन स्टार फलंदाज नितिश रेड्डी)
युपीआय (UPI) सुविधा देणाऱ्या थर्ड पार्टी ॲपसाठी एनपीसीआयने काही नवीन निर्बंध आणायचं ठरवलं आहे. गुगल पे, फोनपे, ॲमेझॉन पे यासारख्या ॲपनी आपला बाजारातील हिस्सा ३० टक्क्यांच्या आत ठेवावा असा नियम आणण्याची एनपीसीआयची तयारी सुरू होती. त्याप्रमाणे त्यांनी सध्याच्या थर्डपार्टी ॲपना दोन वर्षांत हिस्सेदारी कमी करायलाही सांगितलं होतं. (UPI Transactions)
पण, आता या निर्णयाचा ते पुनर्विचार करणार आहेत. शिवाय या क्षेत्रात नवीन स्पर्धा निर्माण करण्यावरही नवीन ॲपशी त्यांची चर्चा सुरू आहे. (UPI Transactions)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community