UPI Transactions : युपीआयचा एका महिन्यात १५,५४७ कोटी व्यवहारांचा नवीन उच्चांक

UPI Transactions : देशात युपीआयची विश्वासार्हता वाढल्याचं दिसत आहे.

38
UPI Transactions : युपीआयचा एका महिन्यात १५,५४७ कोटी व्यवहारांचा नवीन उच्चांक
  • ऋजुता लुकतुके

संपूर्णपणे भारतात विकसित झालेल्या युपीआय प्रणालीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला गेला आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत देशात तब्बल २२३ लाख कोटींचे व्यवहार हे युपीआय प्रणाली वापरून झाले. आणि आतापर्यंतचा हा उच्चांक असल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या आशयाचं एक ट्विट करताना युपीआयचा बाहेर देशात वाढलेला वापर आणि देशातील युपीआयची विश्वासार्हता यावर भाष्य केलं आहे. (UPI Transactions)

युपीआय आणि रुपे प्रणालींनी गेल्या काही वर्षांत भारतातच नाही तर परदेशातही शिरकाव केला आहे. सध्या भारतासह बाहेरच्या ७ देशांमध्ये युपीआय प्रणाली वापरली जाते. संयुक्त अरब अमिराती, भूतान, फ्रान्स, नेपाळ, सिंगापूर, मॉरिशस आणि श्रीलंका या देशांमध्ये युपीआय पोहोचली आहे आणि या देशांशी भारताचा होणारा आंतरराष्ट्रीय व्यापारही देशांतर्गत चलनांमध्ये शक्य झाला आहे. त्यामुळे भारताच्या परकीय चलन गंगाजळीवरही त्याचा भार पडत नाही. (UPI Transactions)

(हेही वाचा – Cabinet मधून डच्चू मिळालेल्या माजी मंत्र्यांनी अधिवेशनाकडे फिरवली पाठ!)

युपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही एनपीसीआयने सुरू केलेली पैसे देवाणघेवाणीची प्रणाली आहे. मोबाईलमधील ॲपच्या माध्यमातून एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे पाठवण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जातो. एका क्लिकवर पैसे हस्तांतरणाचा व्यवहार त्यामुळे पूर्ण होऊ शकतो. ही प्रणाली पूर्णपणे भारतात विकसित झालेली आहे. (UPI Transactions)

या प्रणालीमुळे आर्थिक देवाणघेवाण सोपी, सुटसुटीत, सुरक्षित आणि गतीशील झाली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये एकूण १६.५८ अब्ज आर्थिक व्यवहार हे युपीआयच्या माध्यमातून झाले होते. हा एक उच्चांकच आहे. देशभरात मोबाईल आणि इंटरनेटचा वाढता वापर आणि उपलब्धता याचबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यात या प्रणालीचा झालेला विकास यामुळे युपीआयची वाढ होताना दिसत आहे. तसंच लोकांनी आर्थिक देवाणघेवाणीसाठी या प्रणालीचा केलेला स्वीकारही वाढत्या लोकप्रियतेसाठी महत्त्वाचा आहे. (UPI Transactions)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.