कोरोना रुग्णांचा ताप कमी जास्तच!

मुंबईतील रुग्णांच्या आकड्यांच्या चढ-उतार सुरू आहे. मंगळवारी दिवसभरात जिथे ७ हजार ८९८ रुग्ण आढळून आले होते, तिथे बुधवारी रुग्ण संख्येचा ताप अधिकच वाढला आणि रुग्ण संख्या ९ हजार ९२५ इतकी झाली. दिवसभरात ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी-अधिक होत असल्याचे दिसून येत आहे.

अशी आहे स्थिती

बुधवारी दिवसभरात ९ हजार ९२५ रुग्ण आढळून आले. तर तेवढेच म्हणजे ९ हजार २७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. बुधवारपर्यंत ८७ हजार ४४३ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. बुधवारी दिवसभरात ५४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामधील ३३ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे होते. या मृतांमध्ये ३० पुरुष आणि २४ महिला रुग्णांचा समावेश आहे. यामधील २ रुग्णांचे वय हे ४० वर्षांखालील तर, ३७ रुग्णांचे वय हे ६० वर्षांवरील होते. उर्वरित १५ रुग्ण हे ४० ते ६० वयोगटातील होते.

(हेही वाचाः बाहेरगावी जाणा-यांना कोणतेही पास नाही… पोलिस महासंचालकांच्या स्पष्ट सूचना!)

९९५ इमारती सील

बुधवारपर्यंत सीलबंद इमारतींची संख्या ९९५ झाली असून, ९० झोपडपट्टी व चाळी या कंटेन्मेंट झोन झाल्या आहेत. सध्या १० हजार ३६१ रुग्ण हे ऑक्सिजन बेडवर आहेत. ६८५० रुग्ण हे सीसीटूमध्ये दाखल झाले आहेत. २ हजार ६६४ रुग्ण हे आयसीयूमध्ये दाखल आहेत. कोरोना रुग्णालय आणि जंबो कोविड केंद्रांमध्ये २० हजार २२ रुग्ण उपचार घेत आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here