केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) 2023 च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत यंदा आकून 1 हजार 16 उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत आदित्य श्रीवास्तव हा देशात प्रथम आला आहे.
1105 जागा रिक्त
यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसद्वारे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय विदेश सेवा (IFS) यासह केंद्र सरकारच्या विविध सेवा आणि विभागांमधील एकूण 1105 रिक्त जागा भरण्यासाठी UPSC नागरी सेवा परीक्षा 2023 आयोजित करण्यात आली होती. गेल्या वर्षी 28 मे रोजी प्री, तर 15 ते 24 सप्टेंबर दरम्यान मेन्स परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल 8 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला.
मेन्स परीक्षा पास केलेल्या उमेदवारांची 2 जानेवारी ते 16 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी ते 15 मार्च आणि 18 मार्च ते 9 एप्रिल, या कालावधीत मुलाखत घेण्यात आली. आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य श्रीवास्तव CSE 2023 मध्ये (AIR 1) देशात पहिला झाला आहे. यानंतर अनिमेश प्रधान द्वितीय क्रमांक (AIR 2) तरडोनुरु अनन्या रेड्डीने तृतीय क्रमांक (AIR 3) मिळवला आहे. या परीक्षेत यशस्वी घोषित झालेल्या सर्व उमेदवारांची यादी UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहता येईल.
Join Our WhatsApp Community