आतापर्यंत आपल्याला बँकेकडून मिळणाऱ्या एटीएम कार्डच्या मदतीने केवळ पैसे काढता येतात हे माहित होते. याशिवाय ऑनलाईन खरेदी करणे किंवा बील भरणे यासाठीही एटीएम, डेबिट कार्डचा वापर आपण करतो. मात्र याच एटीएमवर अपघाती विमा फ्रीमध्ये मिळतो हे तुम्हाला माहित आहे का? मात्र याबद्दल अनेकांना माहित नसल्याने बँक ग्राहक या अपघाती विम्याचा लाभ घेताना दिसत नाही. यामुळे पैसै मोजून अपघातानंतर उपचार केले जातात. यासह अपघाती मृत्यू झाल्यास वारसालाही याची माहिती नसल्याने त्याचेही मोठे नुकसान होते.
(हेही वाचा – WhatsApp वर मिळणार आता पूर्ण प्रायव्हसी, लवकरच लॉंच होणार ‘हे’ नवं फीचर!)
जाणून घ्या इन्शुरन्स क्लेमविषयी…
डेबिट कार्ड, एटीएम कार्डसह तुम्हाला अपघाती विम्याची सुरक्षा मोफत दिली जाते. विम्याची रक्कम ही त्या-त्या कार्डाच्या श्रेणीनुसार असते. उदाहरण सांगायचे झाले तर देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय ही त्यांच्या ग्राहकांना एटीएमवर २० लाख रूपयापर्यंतचा अपघाती विमा देत असते. एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, डेबिट कार्डधारकांना मोफत विमा संरक्षण दिले जाते. हे विमा संरक्षण २५ हजार ते २० लाखांपर्यंत असू शकते. एटीएम कार्डाच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम ठरवली जाते.
विम्याचा क्लेम करण्यासाठी फक्त एक अट म्हणजे अपघाताच्या तारखेपासून ९० दिवसांच्या आधी एटीएम मशीनवर किमान एकदा तरी हे कार्ड वापरले गेले असणं आवश्यक आहे. डेबिट कार्ड धारकाचा अपघात किंवा विमान अपघातात मृत्यू झाल्यास एटीएम कार्डवर उपलब्ध विमा संरक्षणाचा लाभ मिळतो. डेबिट कार्ड वापरून विमानाचे तिकीट खरेदी केले असल्यास तुम्हाला विमान अपघातात विम्याचा दावा करता येतो. कार्ड धारकाचा यामध्ये मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला लाभ मिळतो.
असा करा इन्शुरन्स क्लेम
- एटीएमवर अपघाती विम्याचा दावा करण्यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जावे लागणार आहे. कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास डेबिट कार्डधारकाच्या नॉमिनीला बँकेच्या शाखेत जाऊन बँकेत अर्ज द्यावा लागणार आहे.
- आवश्यक कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील. अपघाताच्या ४५ दिवसाच्या आता कार्ड धारकाला बँकेत जाऊन याबाबत अपघात विम्यासंदर्भात दावा करावा लागेल.