‘समग्र शिक्षा अभियानां’तर्गत शाळेच्या प्रारंभी म्हणजे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश (uniform) दिले जातात. मात्र यावेळी शाळा सुरु होऊन ३ महिन्यांनंतर विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेशाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये गणवेशाच्या रुपात बदल करण्यात आला आहे. परंतु या बदलाला ‘अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटने’ने (Urdu Teachers Association) विरोध केला आहे. ज्यामुळे गणवेशाची एलर्जी होऊन उर्दू शिक्षक संघटनेचा हेकेखोरपणा आणि मनमानी कारभार उघडकीस आला आहे.
(हेही वाचा : Maha Kumbh : सुरक्षेसाठी महाकुंभात स्नान करण्यासाठी येण्याची आधारकार्ड तपासा, आखाड्याची मागणी)
दरम्यान उर्दू शिक्षक संघटनेचे (Urdu Teachers Association) संस्थापक साजिद अहमद (Sajid Ahmed) यांनी उर्दू शाळांतील विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे पूर्ण पॅंट, सलवार, स्कार्फ मिळायला हवेत, अशी मागणी केली. मात्र फक्त उर्दू शाळेतच स्वतंत्र वेगळा गणवेश (uniform) का हवा? असा सवाल ही यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community