पतीने आई-वडिलांना सोडून घरजावई बनून रहाण्याचा पत्नीचा आग्रह म्हणजे क्रूरता आहे, असा निर्णय देत दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) एका पुरुषाची घटस्फोटाची याचिका मंजूर केली आहे. पुरुषाची घटस्फोटाची याचिका कौटुंबिक न्यायालयाने सुरुवातीला फेटाळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
याचिकाकर्त्यांची घटस्फोटाची मागणी कौटुंबिक न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर याचिका कर्त्याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द करून त्याच्या पत्नीने केलेल्या आरोपांतूनही मुक्तता केली. तसेच घटस्फोटही मंजूर केला. दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी झाली.
(हेही वाचा – Mumbai Mahanagar Palika Bharti 2023: मुंबई महानगर पालिकेत ४२ हजार जागा रिक्त ,अनेक जागांवर होणार भरती)
या प्रकरणात महिलेनेही पतीच्या विरोधात कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल केला होता. ‘पतीने हुंड्यासाठी छळ केला आहे. पती मद्यपी होता, त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार आणि क्रौर्य केले’, असेही आरोप महिलेने केले आहेत. तिने मार्च 2002 मध्ये सासरचे घर सोडले.
पालकांचे वय झाल्यावर त्यांची काळजी घेणे, ही मुलाची नैतिक जबाबदारी – सर्वोच्च न्यायालय
या प्रकरणी उच्च न्यायालयाने (Delhi High Court) सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा संदर्भ दिला. त्या निकालामध्ये म्हटले होते की, ‘मुलाला त्याच्या कुटुंबापासून वेगळे होण्यास सांगणे म्हणजे क्रूरता आहे. भारतातील एका हिंदू मुलासाठी, लग्नानंतर त्याच्या कुटुंबापासून वेगळे होणे सामान्य किंवा योग्य नाही. पालकांचे वय झाल्यावर त्यांची काळजी घेणे, ही त्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे.’
सर्वोच्च न्यायालय म्हणते, पतीने आई-वडिलांचा त्याग करून ‘घरजावई’ बनण्याचा पत्नीच्या कुटुंबीयांचा आग्रह म्हणजे क्रूरता आहे. कोणत्याही वैवाहिक नातेसंबंधाचा पाया हा सहवास आणि वैवाहिक सुसंवाद आहे. एकमेकांच्या सहवासातून मिळणारे सुख आणि मानसिक समाधान, हा विवाहाचा गाभा आहे.
खोट्या तक्रारी हे क्रूर कृत्य – उच्च न्यायालय
उच्च न्यायालयाने या निकालाचा संदर्भ देत म्हटले आहे की, याचिकाकर्ते काही महिनेच एकत्र राहत होते. त्यामुळे त्यांचे वैवाहिक संबंध टिकवून ठेवता येत नाहीत. वैवाहिक नातेसंबंधापासून वंचित ठेवणे हे अत्यंत क्रूरतेचे कृत्य आहे. त्या व्यक्तीला त्याच्या पत्नीने दाखल केलेल्या फौजदारी खटल्यातून निर्दोष मुक्त करण्यात येत आहे. तिने त्याच्यावर क्रूरता आणि विश्वासभंगाचा आरोप केला होता; परंतु महिलेच्या आरोपांना पुष्टी मिळाली नाही. खोट्या तक्रारी हे क्रूरतेचे कृत्य आहे, असेही न्यायालय या वेळी म्हणाले.
न्यायालयाने (Delhi High Court) शेवटी असा निष्कर्ष काढला की, पुराव्यांवरून असे दिसून आले आहे की, महिला तिच्या पतीपासून कोणत्याही कारणाशिवाय विभक्त झाली, त्यामुळे ती कर्तव्य आणि कुटुंब यापासून दूर गेली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community