अमेरिकन सैन्याने सोमालियातील (Somalia) इसिसच्या (US Airstrike ISIS) तळांवर हवाई हल्ले केले आहेत, ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले आहेत, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शनिवारी रात्री केली आहे.
अमेरिकन संरक्षण विभागाच्या म्हणजेच पेंटागॉनच्या (Pentagon) सुरुवातीच्या अंदाजानुसार, या हल्ल्यांमध्ये अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. या हल्ल्यांमध्ये कोणत्याही नागरिकाचे नुकसान झाले नाही.
(हेही वाचा – Beed मधील १८३ जणांचे शस्त्रपरवाने रद्द; ११८ परवानाधारक मृत असल्याचे उघड)
डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मिडियावर पोस्ट
आज सकाळी मी सोमालियामध्ये आयसिसच्या एका वरिष्ठ हल्लेखोरावर आणि त्याने भरती केलेल्या दहशतवाद्यांवर लष्करी हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते. हे दहशतवादी गुहांमध्ये लपले होते, पण आम्ही त्यांच्यावर अचूक हल्ला केला. ते अमेरिका आणि आमच्या मित्र राष्ट्रांसाठी धोकादायक होते. अमेरिकेने हवाई हल्ल्यांनी, ज्यामध्ये दहशतवादी लपले होते त्या गुहा उद्ध्वस्त केल्या आहेत. नागरिकांना कोणतीही हानी न पोहोचवता अनेक दहशतवादी मारले गेले आहेत, अशी पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
“आमच्या सैन्याने गेल्या अनेक वर्षांपासून या इसिस हल्ल्यांचे नियोजन करणाऱ्याला लक्ष्य केले आहे; परंतु बायडेन आणि त्याच्या साथीदारांनी हे काम पूर्ण करण्यासाठी पुरेशी जलद कारवाई केली नाही. मी केली ! अमेरिकन लोकांवर हल्ला करणाऱ्या आयसिस आणि इतर सर्वांना संदेश आहे की, आम्ही तुम्हाला शोधून शोधून मारू, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ म्हणाले की, “अमेरिकन सैन्याच्या आफ्रिका कमांडने केलेले हल्ले ट्रम्प यांनी निर्देशित केले होते आणि यासाठी सोमालिया सरकारशी समन्वय साधला होता.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community