‘या’ औषधाने तीन वर्षांपर्यंत रोखू शकता डायबेटिस, अन्न व औषध प्रशासनाची मंजुरी

जगभरात डायबेटिसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. म्हाता-यांपासून ते पोरवड्या वयातील लोकांना डायबेटिस झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे डायबेटिस नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्यात येत आहे. डायबेटिसला रोखण्यासाठी आता अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने एका खास औषधाला मंजुरी दिली आहे. या औषधामुळे तीन वर्षांपर्यंत डायबेटिसचा धोका रोखणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोणते आहे औषध?

टॅप्लिझुमॅब म्हणजेच टेझील्ड या नावाने उपलब्ध असणा-या औषधामुळे टाइप-1 डायबेटिसचा धोका तीन वर्षांपर्यंत रोखता येणार आहे. या औषधाला अमेरिकेने मंजुरी दिली असून ब्रिटनही मंजुरी देण्याच्या तयारीत आहे. सध्या अमेरिकेत या औषधाच्या चाचण्या करण्यात येत आहेत.

(हेही वाचाः सर्वोच्च न्यायालयाचेही Online RTI Portal सुरू होणार, न्यायालयातील ‘ही’ माहिती घरबसल्या मिळणार)

असा होणार फायदा

डायबेटिस टाइप-1 ची पहिली स्टेज असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर वाढते पण शरीर इन्शुलिन बनवते, अशा रुग्णांना हे औषध दिले जाईल. इम्युनोथेरपीप्रमाणे काम करणा-या या औषधामुळे डायबेटिस मूळापासून नियंत्रणात राहण्यास मोठी मदत होणार आहे. या औषधाच्या चाचण्या यशस्वी होत असून, रुग्णांमध्ये औषधाचा परिणाम देखील दिसून येईल, असा दावा संशोधकांनी केला आहे.

(हेही वाचाः पनीर शुद्ध आहे की अशुद्ध? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरुन खात्री करुन घ्या)

शरीरात इन्शुलिन तयार करणा-या स्वादुपिंडातील पेशींवर हल्ला करण्यापासून हे औषध रोखते आणि त्यामुळे शरीरात वाढणारी ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here