- ऋजुता लुकतुके
अमेरिकेत राहणारे परदेशी निर्वासित आता तिथेच राहून आपल्या एच१बी व्हिसाचं (H1B Visa) नुतनीकरण करून घेऊ शकतील. अमेरिकन व्हाईट हाऊसने त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर एक योजना सुरू केली आहे. सुरुवातीला २०,००० आवेदनांसाठी हा प्रयोग करून बघण्यात येणार आहे. त्यामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या अनिवासी भारतीयांनाही दिलासा मिळणार आहे. (US H1B Visa)
५ फेब्रुवारीपासून ही योजना सुरू होणार असून अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर ऑनलाईन ही प्रक्रिया सुरूही झाली आहे. एकदा अर्ज केल्यानंतर अर्जाचा विचार होईपर्यंत अर्जदाराला अमेरिका सोडून जाता येणार नाही. भारतातील अनेक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातले कर्मचारी सध्या अमेरिकेत या व्हिसावर राहतात. याला वर्क व्हिसा असंही म्हटलं जातं. म्हणजे कामानिमित्त अमेरिकेत राहण्याची परवानगी असलेले लोक या व्हिसासाठी अर्ज करू शकतात. (US H1B Visa)
A pilot program allowing a limited number of H-1B workers to renew visas in the US is expected to launch in January, the State Department says.#visas #H1B #immigrationhttps://t.co/TsCa3t8YX3
— Andrew Kreighbaum (@kreighbaum) November 28, 2023
(हेही वाचा – Budget Session 2024 : भारत टॉप 5 अर्थव्यवस्थांत पोहोचला; राष्ट्रपतींनी केले सरकारचे कौतुक)
इतके व्हिसा भारतीय नागरिकांना दिले गेले
या व्हिसाची मुदत ही ६ वर्षांची असते. आणि सहाव्या वर्षी मुदतीआधी त्याचं नुतनीकरण झालं नाही, तर अर्जदाराला संपूर्ण एक वर्षं अमेरिकेच्या बाहेर रहावं लागतं. आणि त्यानंतरच नुतनीकरणासाठी अर्ज करता येतो. असा सध्याचा नियम आहे. पण, व्हाईट हाऊसने बऱ्याच मागणीनंतर त्यात बदल करण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठीच प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू करण्यात येणार आहे. (US H1B Visa)
या व्हिसावर अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी नागरिकांमध्ये भारतीयांचा वाटा खूप मोठा आहे. अमेरिकन सरकारी आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये दिल्या गेलेल्या ४.४१ लाख एच१बी व्हिसापैकी (H1B Visa) ३.३२ व्हिसा भारतीय नागरिकांना दिले गेले. (US H1B Visa)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community