अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी २८ ऑक्टोबरच्या रात्री त्यांचे सरकारी निवासस्थान ‘व्हाईट हाऊस’मध्ये दिवाळी साजरी केली. यात ६०० हून अधिक भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक सहभागी झाले होते. (Diwali In White House)
माझ्या राष्ट्राध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सिनेटर या कार्यकाळात मी मोठ्या संख्येने भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांसमवेत काम केले आहे. दक्षिण-आशियाई अमेरिकी समुदायाने अमेरिकी जीवनाचे प्रत्येक अंग समृद्ध केले आहे. हा जगातील सर्वांत वेगाने वाढणारा समुदाय आहे. आता ‘व्हाईट हाऊस’मध्ये दिवाळी (Diwali 2024) अभिमानाने साजरी केली जाते, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या वेळी म्हणाले.
काय आहे इतिहास ?
२००३ मध्ये जॉर्ज बुश राष्ट्राध्यक्ष असतांनाच्या काळात व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यास प्रारंभ झाला. वर्ष २००९ मध्ये बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये एकांतात दिवाळी साजरी केली होती.
‘प्यू रिसर्च सेंटर’च्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेत ५४ लाख भारतीय वंशाचे लोक आहेत. त्यांपैकी ४८ टक्के हिंदू आहेत. सध्या बायडेन प्रशासनात १३० हून अधिक भारतीय महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. अमेरिकेतील अनुमाने ३८ टक्के डॉक्टर भारतीय वंशाचे आहेत. भारतीय-अमेरिकी अमेरिकेतील सर्वाधिक कमाई करणारा वांशिक गट आहे. (Diwali In White House)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community