US Presidential Election 2024 : ‘या’ १० गोष्टींमुळे साध्य झाला डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय

US Presidential Election 2024 : अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीची निवडणूक अटीतटीची लढाई समजली जात होती. 

118
US Presidential Election 2024 : 'या' १० गोष्टींमुळे साध्य झाला डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय
  • ऋजुता लुकतुके

यंदाची अध्यक्षीय निवडणूक ही काटे की टक्कर असेल असं मानलं जात होतं. पण, प्रत्यक्षात आतापर्यंतच्या निकालांमध्ये रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. २९५ इलेक्टोरल मतांच्या आधारे त्यांनी बहुमतासाठी आवश्यक २७० चा आकडा आरामात पार केला आहे. अजून दोन राज्यांतील मतमोजणी पूर्ण झालेली नाही. आणि या राज्यांतही डोनाल्ड ट्रम्पच आघाडीवर आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी मोठा विजय मिळवेलला दिसत आहे.

ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना त्यांची कारकीर्द वादळी ठरली होती. त्यांच्यावर तेव्हाच्या राजकीय प्रकरणातील काही खटलेही सुरू होते आणि त्यांचे पदसाद आताच्या निवडणूक मोहिमेवर पडले होते. त्यामुळे ट्रम्प यांच्यासाठी ही लढाई कठीण मानली जात होती. पण, प्रत्यक्षात ट्रम्प यांच्यावरच अमेरिकन जनतेनं विश्वास दाखवला आहे. ट्रम्प यांच्या विजयाची १० कारणं समजून घेऊया, (US Presidential Election 2024)

(हेही वाचा – EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; उबाठाच्या उमेदवाराकडे खंडणीची मागणी)

१. अमेरिकन अर्थव्यवस्था – अमेरिकन अर्थव्यवस्था कोरोना काळानंतर मोठ्या उतार चढावांमधून जात आहे. जो बायडेन यांच्या कार्यकाळात देशावरील कर्ज वाढलं. त्यातूनच अमेरिकन निवडणुकीपूर्वी देशावरील कर्जामुळे दैनंदिन खर्चही फेडरल बँकेकडून बंद होण्याची वेळ आली होती. या संकटाला अमेरिकन डेब्ट सिलिंग क्रायसिस असं म्हणतात. फक्त कर्ज वाढत होतं असं नाही तर लोकांची बचत करण्याची क्षमताही कमी झाली होती. त्यामुळे फेडरल बँकेला कर्जावरील व्याजदर चढे ठेवून महागाई आटोक्यात आणणंही शक्य नव्हतं. त्यातून फेडरल बँकेनं जगात सगळ्यात आधी व्याददर कपातीचं धोरण सुरू केलं. आणि या सगळ्याचा ताण अमेरिकन अर्थव्यवस्थेवर बसत होता. ही वस्तुस्थिती बायडेन यांच्या विरोधात जनतेसमोर मांडण्यात डोनाल्ड ट्रम्प यशस्वी झाले. ‘मेक अमेरिका स्ट्राँग अगेन’ हे ट्रम्प यांचं घोषवाक्य लोकांपर्यंत पोहोचलं आणि लोकांनी त्यांना मतं दिली.

२. महागाई – अमेरिकेत महागाई आणि रोजगार या दोन ज्वलंत समस्या आहेत. त्यातच फेडरल बँकेला व्याजदर कपातीची भूमिका तुलनेनं लवकरच घ्यावी लागली. व्याजदर कमी झाले तर लोकांच्या हाती पैसा खेळून महागाई वाढतेच. महागाई दर आटोक्यात आणण्याचं ठळक आश्वासन ट्रम्प यांनी जनतेला दिलं आहे. लोकांनी त्यावर विश्वासही ठेवला आहे. शिवाय आपल्या काळात आपण महागाई कमी करण्यात यशस्वी झालो होतो, असं ट्रम्प यांनी जनतेला सांगितलं. (US Presidential Election 2024)

(हेही वाचा – Salman Khan Threat : सलमानला धमकी देणाऱ्या बिष्णोईला कर्नाटकातून अटक)

३. जो बायडेन यांचं फसलेलं नेतृत्व – ट्रम्प यांच्यानंतर जो बायडेन अमेरिकेचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वात आत्मविश्वास आणि ठोस भूमिकेचा अभाव होता. शिवाय त्यांचं वयही जास्त होतं. शिवाय निर्णय घेण्याची त्यांची क्षमताही नंतर कमी होत गेली. काही सभांमध्ये बायडेन आपलं भाषणही विसरल्याचं समोर आलं. त्यातून जो बायडेन यांचं नेतृत्व कमकुवत असल्याचं सिद्ध झालं आणि नेमके बायडेनच डेमोक्रॅटिक पक्षाचे सुरुवातीचे उमेदवार होते. पहिल्या काही अध्यक्षीय वादविवादांदरम्यान बायडेन यांचं दुर्बल्य उठून दिसलं. तुलनेनं ट्रम्प आपल्या विचारांवर ठाम आणि ठोस आश्वासन देणारे ठरले.

४. कमला हॅरिस यांना प्रचारासाठी मिळाले १०० दिवस – जो बायडेन यांची उमेदवारी मागे घेतल्यानंतर कमला हॅरिस यांची अध्यक्षीय निवडणुकीत एंट्री झाली. पण, त्यांच्या हातात प्रचारासाठी फक्त १०० दिवस होते. त्यानंतरचे काही वादविवाद त्यांनी जिंकलेही. पण, एकूणच अनेक राज्यांत त्यांच्याबद्दल पुरेशी माहिती लोकांना नव्हती. अमेरिकेत अध्यक्षाची जनमानसातील प्रतिमाही महत्त्वाची ठरते. तशी प्रतिमा हॅरिस यांची तयारच होऊ शकली नाही. परिणामी, अमेरिकेतील प्रभावशाली व्यक्ती आणि कलाकार मंडळी हॅरिस यांच्या बाजूने उभी राहिली, हॅरिस यांनी १०० दिवसांत १.०४ अब्ज अमेरिकन डॉलर इतका खर्च निवडणुकीसाठी केला तरी २८ राज्यांमध्ये त्यांचा पराभवच झाला. (US Presidential Election 2024)

(हेही वाचा – Delhi Air Pollution: दिल्लीतील AQI 367 च्या वर; यमुनेच्या काठावर छठपूजेस बंदी, त्वचाविकाराचा धोका वाढला)

५. ट्रंप यांचं अप्रवासी धोरण – ट्रम्प यांच्या भाषणातून त्यांच्या धोरणांबद्दलची स्पष्टता दिसत होती. अमेरिकेत बेरोजगारी वाढतेय. आणि बाहेरून येणारे लोक त्यासाठी जबाबदार आहेत, असा स्थानिक तरुणांचा समज झाला आहे. त्याचवेळी अमेरिकन उद्योग क्षेत्राला कुशल कामगारांची गरज आहे. त्यामुळे त्यांची मागणी आहे ती एच१बी व्हिसा धोरण आतापेक्षा लवचिक करण्याचं. अशावेळी स्वत: उद्योजक असलेले ट्रंप आपलं प्रवासी धोरण लोकांना नीट समजावून सांगू शकले. कायदेशीर प्रक्रिया पाळून योग्य उमेदवारांना अमेरिकेत बाहेरून प्रवेश दिला जाईल असं ते वारंवार सांगत राहिले. आणि बाहेरुन येणारे लोंढे कसे थांबवणार याचीही योजना त्यांच्याकडे होती.

६. ट्रंप यांचं परराष्ट्र व्यवहार धोरण – ट्रम्प यांनी जे मुख्य मुद्दे प्रचारादरम्यान उचलले त्यातील बेरोजगारी, महागाई यांच्याबरोबरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो रशिया-युक्रेन युद्धाचा. हे युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेणार, असं ते वारंवार सांगत होते. लोकांना युद्ध आणि त्यामुळे पसरलेल्या अनिश्चिततेचा कंटाळा आल्याचं त्यांना समजत होतं आणि त्यांनी हा मुद्दा उचलून धरला. तो लोकांपर्यंत पोहोचवला. शिवाय अमेरिकेत बाहेरून येणाऱ्या मालामुळे देशांतर्गत वस्तू व सेवांचा खप कमी झाल्याची लोकांची धारणा आहे. अशावेळी बाहेरून आलेल्या मालावर आयात शुल्क वाढवण्याचं त्यांचं आश्वासनही लोकांना पसंत पडलं. (US Presidential Election 2024)

(हेही वाचा – EPF : फक्त मिस कॉल देऊन जाणून घ्या तुमचा पीएफ बॅलन्स)

७. ट्रम्प यांच्या विरोधातील खटले – आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीतील पहिल्या ४ वर्षांत ट्रम्प वादळी ठरले होते आणि त्यांच्या विरोधात काही खटलेही दाखल झाले होते. या खटल्यांमुळे आपल्याला व कुटुंबीयांना कसा मानसिक त्रास झाला हे जमतेला पटवून देण्यात ते यशस्वी झाले. तसंच हे खटले म्हणजे त्यांच्या विरोधातील षडयंत्र होतं, असं पटवून देण्यातही ट्रम्प यशस्वी ठरले.

८. ट्रंप समर्थकांचा सोशल मीडिया प्रचार – ट्रम्प यांच्या समर्थकांचा ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन,’ नावाचा एक सोशल मीडिया गट आहे. या गटाने पद्धतशीर काम करताना कमला हॅरिस यांचं नेतृत्व कसं कमजोर आहे आणि ट्रम्प हा त्यांच्यासाठी कसा ताकदीचा पर्याय आहे हे लोकांना पटवून दिलं. सोशल मीडियाची ताकद ट्रम्प समर्थकांनी वापरली.

(हेही वाचा – ICC Test Ranking : विराट कोहली, रोहितला आयसीसी क्रमवारीत जबरदस्त धक्का, पहिल्या विसातून गायब)

९. ट्रम्प यांचे खंदे समर्थक एलॉन मस्क – कमला हॅरिस यांना पॉप स्टार आणि बुद्धिजीवी वर्गाचा पाठिंबा होता. पण, ट्रम्प यांचे खंदे समर्थक होते एलॉन मस्क. मस्क यांनी ट्रम्प यांचा पुरस्कार तर केलाच, शिवाय निवडणूक प्रचार मोहिमेवर ११९ दशलक्ष अमेरिकन डॉलर खर्च केले. ट्रम्प यांची धोरणं सोशल मीडियावर लोकांना समजावून सांगितली.

१०. बायडेन विरोधी लाट – अमेरिकेत नाही म्हटलं तरी जो बायडेन यांच्या राजवटीविरोधात एक सुप्त लाट होती. खासकरून गाझा पट्टीतील संघर्ष, रशिया-युक्रेन युद्ध यावरून बायडेन यांचं नेतृत्व कमजोर असल्याची लोकांची भावना होती. अमेरिकेत अरब व मुस्लिम अमेरिकनही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची मतं ट्रम्प यांनी आपल्या बाजूने प्रभावीपणे वळवली. (US Presidential Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.