US Presidential Election 2024 : ट्रम्प किंवा हॅरिस निवडून आल्या तर भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर त्याचा काय परिणाम होईल?

US Presidential Election 2024 : भारतावर सगळ्यात मोठा परिणाम व्हिसा धोरणाचा होणार आहे. 

41
US Presidential Election 2024 : ट्रम्प किंवा हॅरिस निवडून आल्या तर भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर त्याचा काय परिणाम होईल?
  • ऋजुता लुकतुके

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत परराष्ट्र धोरणा इतकाच महत्त्वाचा मुद्दा आहे तो परदेशातून येणाऱ्या कुशल कामगारांच्या वर्क व्हिसाचा म्हणजेच एच१ बी व्हिसाचा. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर या धोरणाचा नक्कीच परिणाम होणार आहे. अमेरिकन सरकारच्या व्हिसा धोरणाचा गैरवापर होत असल्याबद्दल अनेकदा बोललं जातं. पण, डोनाल्ड ट्रम्प यापूर्वी राष्ट्राध्यक्ष असतानाही आणि आताही ते निवडून आल्यावर या धोरणात काही बदल होईल असं तज्ज्ञांना वाटत नाहीए. कारण, मागच्या काही राष्ट्राध्यांनी या धोरणात विशेष लक्ष घातलेलं नाही. (US Presidential Election 2024)

आताही ट्रम्प किंवा कमला हॅरिस यापैकी कुणीही निवडून आलं तरी तर व्हिसा धोरणात लगेच काही बदल होईल अशी चिन्हं नाहीत. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना आताप्रमाणेच काम सुरू ठेवता येईल. अमेरिकेला आताही या क्षेत्रातील कुशल कामगारांची गरज पडणारच आहे. ती भारतातून भागत असल्यामुळे हे धोरण जैसे थेच राहील, असं तज्ज्ञांना वाटतं. (US Presidential Election 2024)

(हेही वाचा – Assembly Election 2024 : कोल्हापुरात काँग्रेसचा प्लॅन ‘बी’; या उमेदवाराला देणार साथ)

‘अमेरिकेतील टेक कंपन्यांचे प्रमुख त्यांच्याकडे कुशल कामगार उपलब्ध नाहीत म्हणून ओरडत असतात आणि मागणीच्या मानाने त्यांची उपलब्धता कमीच आहे. त्यामुळे डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन सरकारनाही उद्योजकांची ही समस्या सोडवायची आहे. त्यामुळे व्हिसा धोरणात बदल होईल असं दिसत नाही,’ युएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमचे अध्यक्ष मुकेश अग्नी यांनी म्हटलं आहे. (US Presidential Election 2024)

एच१ बी व्हिसा हा अप्रवासी अमेरिकन व्हिसा आहे, जो कंपन्यांना त्यांना लागणारे कुशल कामगार बाहेरच्या देशातून बोलावून त्यांना अमेरिकेत नोकरी देण्याची परवानगी देतो आणि अमेरिकत टेक कंपन्यांना कुशल कामगारांची गरज असते. टीसीएस, विप्रो, एचसीएल टेक यासारख्या प्रमुख टेक कंपन्या आपल्या नोकरदार वर्गाला अमेरिकेत या व्हिसावरच पाठवत असतात. शिवाय भारतात कार्यरत असलेल्या टेक कंपन्यांचा ५० टक्के महसूल हा अमेरिकेतून येतो. दरवर्षी साधारणपणे ६५,००० लोकांना एच१ बी व्हिसा अमेरिकेकडून दिला जातो. सध्याच्या एच१ बी व्हिसा प्रणालीत तज्ज्ञांना काही त्रुटी दिसतात. लॉटरी पद्धतीने व्हिसा कुणाला द्यायचा हे ठरवलं जातं. तर एकच उमेदवार अनेक अर्ज करू शकतो. अशा काही त्रुटींमुळे ही प्रणाली वादात सापडली आहे. पण, या प्रणालीत बदल होण्याची शक्यताही कमीच आहे. (US Presidential Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.