ऑक्टोबर महिना हिंदूंसाठी विशेष महिना आहे. या महिन्याची सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख आहे. या महिन्यात नवरात्री आणि दिवाळी हे २ मोठे सणही याच महिन्यात येतात. त्यामुळे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्याने ‘ऑक्टोबर’ या महिन्याला अधिकृतपणे ‘हिंदू हेरिटेज मंथ’ (Hindu Heritage Month) म्हणून घोषित केले आहे. राज्यातील हिंदू-अमेरिकन समुदायाचे योगदान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. जॉर्जियातील हिंदू संघटना अनेक दिवसांपासून यासंदर्भात मागणी करत होत्या.
(हेही वाचा – I.N.D.I.A Alliance : इंडिया बैठक : बाहेर कीर्तन आत तमाशा)
गव्हर्नर ब्रायन केम्प म्हणाले की, हिंदू-अमेरिकन समुदायाने जॉर्जियन लोकांचे जीवन समृद्ध करून राज्याच्या जीवन शक्तीसाठी मोठे योगदान दिले आहे. हिंदू वारसा महिना हा भारतीय संस्कृती आणि तिथे रुजलेल्या विविध आध्यात्मिक परंपरांवर लक्ष केंद्रित करून साजरा केला जाईल.
ऑक्टोबर हा हिंदू वारसा महिना म्हणून घोषित केल्याबद्दल अमेरिकेतील अनेक हिंदू संघटनांनी जॉर्जियाचे गव्हर्नर ब्रायन केम्प यांचे आभार मानले आहेत. जॉर्जियन गव्हर्नर ब्रायन केम्प यांनी ऑक्टोबर हा हिंदू हेरिटेज मंथ म्हणून घोषित केल्याचे X (Twitter) वर कोलिशन ऑफ हिंदू ऑफ नॉर्थ अमेरिकेने जाहीर केले आहे.
#BREAKING: Georgia proclaims October as Hindu Heritage month. Our thanks to Governor @BrianKempGA for this recognition. This was made possible by the untiring dedication of our friends at the Hindus of Georgia PAC. Hinduism has contributed greatly to the cultural milieu of… pic.twitter.com/Rh18yYqGII
— CoHNA (Coalition of Hindus of North America) (@CoHNAOfficial) August 30, 2023
या वर्षाच्या सुरुवातीला, जॉर्जिया विधानसभेने ‘हिंदूफोबिया’चा (हिंदू धर्माविरूद्ध पूर्वग्रह) निषेध करणारा ठराव संमत केला. असा ठराव पारित करणारे ते पहिले अमेरिकी राज्य बनले आहे. प्रस्तावात ‘हिंदुफोबिया’ आणि हिंदूविरोधी कट्टरतेचा निषेध करत, अमेरिकन समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीत आणि लाखो लोकांचे जीवन सुधारण्यासाठी योग, आयुर्वेद, ध्यान, भोजन, संगीत आणि कलांमध्ये हिंदू समुदायाने दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
हिंदू हेरिटेज मंथ ही एक जागतिक चळवळ आहे, जी हिंदू धर्मातील परंपरा आणि हिंदू लोकांचे मानवी समाजातील योगदान म्हणून अधोरेखित करते. हिंदू धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे, या धर्माचे जगभरात एक अब्ज अनुयायी आहेत. सुमारे ३० लाख हिंदू लोक युनायटेड स्टेट्समध्ये राहत असून, ज्यांचे तिथले राजकारण आणि समाजकारणातही महत्त्वपूर्ण योगदान आहे.(Hindu Heritage Month)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community