युद्धग्रस्त गाझा पट्टीचा ताबा अमेरिका घेईल; Donald Trump यांची घोषणा

युद्धग्रस्त गाझा पट्टीवर स्वत:चा अंमल बसवून त्या भागाचा आर्थिक विकास करू, अशी घोषणा Donald Trump यांनी केली आहे.

40

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ग्रीनलँड आणि पनामा ताब्यात घेण्याच्या घोषणेनंतर आता थेट गाझा (Gaza Strip) पट्टी ताब्यात घेऊन तेथे विकास करण्याचे धक्कादायक विधान केले आहे. या विधानामुळे आता जगभरात गोंधळ उडाला आहे.

इस्रायलचे (Israel) पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या भेटीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘युद्धग्रस्त गाझा पट्टीवर स्वत:चा अंमल बसवून त्या भागाचा आर्थिक विकास करू. त्यामुळे तेथे अमर्यादित रोजगारनिर्मिती होईल,’ अशी थेट घोषणा केली आहे.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी भारतीय पंच नितीन मेमन यांचाही पाकला जायला नकार)

गाझा पट्टीत सध्या राहत असलेल्या सुमारे २० लाख पॅलेस्टिनींनी पश्चिम आशियातील इतर देशांत विस्थापित व्हावे, असा अजब सल्लाही ट्रम्प यांनी दिला. मात्र, गाझा पट्टीत कोणाला राहू देणार, यावर त्यांनी काही भाष्य केले नाही. ट्रम्प म्हणाले की, ‘पॅलेस्टिनींना (Palestine) अन्य कुठलाही पर्याय नसल्यामुळे ते गाझा पट्टीत आहेत. गाझा पट्टी आत्ता पूर्ण उद्ध्वस्त आहे. अगदी प्रत्येक इमारत मोडकळीस आली आहे. कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाखाली पॅलेस्टिनी राहत आहेत. हे अतिशय धोकादायक आहे. याउलट, ते अतिशय सुंदर घरांत सुरक्षित राहू शकतात.

अमेरिका गाझा पट्टी ताब्यात घेईल. आम्ही त्याची मालकी घेऊ आणि त्या जागेवरील सर्व धोकादायक न फुटलेले बॉम्ब आणि इतर शस्त्रे नष्ट करणे, जागेचे सपाटीकरण करणे आणि नष्ट झालेल्या इमारती पाडणे, त्या इमारती जमीनदोस्त करणे ही जबाबदारी आपली असेल, असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे अरब देशांत संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, येत्या महिनाभरात अमेरिका वेस्ट बँकवरील इस्रायलच्या सार्वभौमत्वाबाबत भूमिका घेईल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.तसेच अमेरिका गाझा पट्टीवर कशा पद्धतीने ताबा मिळवेल, याचा आराखडा समोर ठेवत तेथे दौरा करण्याचीही इच्छा व्यक्त केली. (Donald Trump)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.