गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरत नसाल तर सावधान, कारण गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरल्यास किंवा मास्क काढल्यास तुम्हाला इन्फ्लुअन्झाचा धोका आहे. फ्लूच्या रुग्णांमध्ये अचानक पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत फ्लूचे रुग्ण 200 टक्क्यांनी वाढले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी H3N2 इन्फ्लुअन्झाचा विषाणूमुळे ताप आणि सर्दी खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. तेव्हा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.
कोरोना सदृश्य इन्फ्लूएंझा देशातील काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असून विविध प्रकारची लक्षणे दिसू लागली आहेत किंवा इन्फ्लूएंझामध्ये, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील कानपूर आणि लखनऊमध्ये इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. महाराष्ट्रालाही दक्षता घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेजारी राज्यांत रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. आता महाराष्ट्रात पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे या विषाणूचा धोका वाढू शकतो, असे म्हटले आहे.
( हेही वाचा: आपला दवाखान्यांसाठीच्या १५० औषधांपैकी ३५ औषधांनाच प्रतिसाद; उत्पादक आणि वितरक कंपन्यांच्या वादाचा बसतोय रुग्णांना फटका )
इन्फ्लूएंझाची प्रमुख लक्षणे कोणती ?
कोरोनाचे रुग्ण कमी झाले असताना आता पुन्हा एका नव्या व्हायरसने डोके वर काढले आहे. इन्फ्लूएंझा H3N2 या व्हायरसचे देशाच्या काही राज्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्याही वाढत असून विविध प्रकारची लक्षणेही दिसू लागली आहेत. ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. याचा त्रास गर्भवती महिलांनाही होत असून, स्वच्छता राखणे, गर्दी टाळली गेली तर यापासून धोका टाळता येणार आहे.
Join Our WhatsApp Community