केईएम, शीव आणि नायर रुग्णालयात आगीच्या धुरापासून बचाव

151

आगीच्या दुघर्टनांमध्ये सर्वप्रथम आग रौद्ररुप धारण करण्यापूर्वी धुराचे लोळ हवेत आणि आसपासच्या परिसरात पसरतात. त्यामुळे आगीच्या धुरामुळे त्याठिकाणी अडकलेल्या लोकांचा जीव गुदमरतो आणि यामुळे अनेक जण बेशुध्द होऊन पडतात. त्यामुळे आगीच्या घटनांमध्ये धुरापासून बचाव करणे ही प्राथमिक आवश्यकता लक्षात घेता महापालिकेच्या केईएम,शीव आणि नायर या तिन्ही प्रमुख रुग्णालयांमध्ये आगीच्या धुरापासून बचाव करणाऱ्या यंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे आगीची घटना घडल्यास किमान धुरापासून बचाव केल्यास रुग्णांसह नातेवाईकांना सहज बाहेर पडता येईल तसेच आगीमुळे होणारी मनुष्यहानी टाळून आगीच्या घटनेवर तात्काळ नियंत्रणा मिळवणे सोपे जाणार आहे.

( हेही वाचा : क्रांतिवीरांच्या विचारांची, कार्याची नवतरूणांनी प्रेरणा घ्यावी – श्याम देशपांडे)

मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव आणि नायर रुग्णांलयांमधील विविध विभागांमध्ये तसेच वैद्यकीय कक्षांमध्ये, अति दक्षता विभागात यांत्रिक आणि विद्युत प्रणाली कार्यरत आहे. या प्रणालीमध्ये बिघाड झाल्यास आग लागू शकते. अशावेळी रुग्णालयातील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना बाहेर पडणे अवघड होते. अशा परिस्थितीत बऱ्याच लोकांचा मृत्यू हा धुरामुळे श्वास गुदमरुन होतो. त्यामुळे केईएम,शीव आणि नायर रुग्णालयात सीव्हीटीएस, इमारतीत असलेल्या आपत्कालिन वैद्यकीय सेवा विभाग, अतिदक्षता विभाग, कॅथॉलॉजी प्रयोगशाळा,आयआरसीयू, ब्रॉन्कोस्कोपी कक्ष आदी ठिकाणी आग लागून झालेला धूर शोधक व गाळून बाहेर काढण्याची प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या यंत्रणेची उभारणी आणि पुढील काळासाठी देखभाल करण्यासाठी निविदा मागवून पात्र कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या तिन्ही रुग्णालयांमध्ये आगीच्या धूर शोधक व गाळून बाहेर काढण्यासाठी विविध करांसह साडेबारा कोटी रुपये खर्च केले जाणार असून यासाठी मॅक एंटरप्रायझेस ही कंपनी यासाठी पात्र ठरली आहे.

आग लागून झालेल्या धूर शोधक व गाळून बाहेर काढण्याच्या प्रणालीचा अवलंब यापूर्वी केईएम रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षत विभाग सात नंबर, बालरोगतज्ञ अतिदक्षता विभाग, कक्ष ३ अतिदक्षता विभाग व शस्त्रक्रियागार अशाप्रकारे एकूण २१ विभागात ही प्रणाली बसवण्यात आलील आहे, ही प्रणाली सध्या अस्तित्वात असल्याची माहिती महापालिकेच्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आगीच्या घटनेच्या वेळी निर्माण होणाऱ्या धुरामुळे लोकांना आग लागलेल्या ठिकाणाहून बाहेर पडण्यास अडथळा होतो. हा धूर सर्वसाधारणपणे विषारी असल्याने आग विझवण्याच्या कामांमध्येही अडथळा होतो. या अडथळ्यावर मात करण्यासाठी धूर काढण्याची यंत्रणा हवेतील हानिकारक वायूंचे प्रमाण कमी करून दुय्यम स्त्रोत म्हणून काम करते, ज्यामुळे भितीदायक परिस्थिती टाळता येवू शकते. रुग्णालयात जागेअभावी नलिका असलेली धूरवाहक वाहिनी बसवणे शक्य नाही, त्यामुळे नलिकाविरहित धूर गाळून घेणारी प्रणाली स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.