इंटरनेटशिवाय वापरा Whatsapp, ‘ही’ आहे सोपी पद्धत

सध्याच्या जगात आपण Whatsapp च्या आहारी गेलो आहोत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपण Whatsapp चा वापर मोठ्या प्रमाणात करत आहोत. अशात तुमचे Whatsapp इंटरनेटशिवाय कसे चालवायचे याची ट्रीक तुम्हाला समजली तर? आता हीच ट्रीक आपण समजून घेणार आहोत.

1 कसा कराल वापर

जर तुम्हाला बिना मोबाईल Whatsapp वापरायचे असल्याचे तुम्हाला डेस्कटाॅप किंवा लॅपटाॅपची गरज लागेल.

2. तीन डाॅट्सवर करा क्लिक

सर्वात आधी तुमच्या अॅंड्राईड स्मार्टफोनवरुन Whatsapp सुरु करा. त्यानंतर सर्वात वर दिसणा-या तीन डाॅट्सवर क्लिक करा. यावर क्लिक केल्यावर तुम्हाला लिंक्ड डिव्हाईस ऑप्शनवर टॅप करावे लागेल. यानंतर मल्टी डिव्हाईस बीटा ऑप्शनवर क्लिक करा.

( हेही वाचा: NASA चे मून मिशन ‘ऑटोमस-1’ यशस्वीरित्या लाॅंच )

3. करा मल्टी डिव्हाईस कनेक्टिव्हीटी

यामध्ये सर्वात खाली तुम्हाला जाॅईन बीटा लिहिलेले बटण दिसेल. यावर क्लिक करावे लागेल. या ऑप्शनसाठी बीटा व्हर्जन जाॅईन करावे लागेल. यानंतर तुम्हाला बॅक जावे लागेल. बॅक केल्यावर तुम्हाला मल्टी डिव्हाईस बीटा कन्फर्मेशन मिळेल. यानंतर तुम्ही चार डिव्हाईस लिंक करु शकतात.

वरील प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला तुमच्या लॅपटाॅप किंवा डेस्कटाॅपवरुन https://web.whatsapp.com/ वर क्लिक करावे लागेल. यानंतर मोबाईलवर मेन्यू ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. यानंतर स्टेप 1 आणि स्पेट 2 कराव्या लागतील. यानंतर स्टेप नंबर 3 पूर्ण झाल्यानंतर लिंक्ड डिव्हाईसवर क्लिक करावे लागेल.

…..आणि करा विना इंटरनेट Whatsapp चा वापर

यानंतर तुम्ही लिंक डिव्हाईस या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यावर https://web.whatsapp.com/ वरील एक QR कोड स्कॅन करावा लागेल. QR स्कॅन केल्यानंतर तुमचे Whatsapp डेस्कस्टाॅप आणि लॅपटाॅपवर लाॅगिन होईल. एकदा तुमच्या डेस्कटाॅप किंवा लॅपटाॅपवर Whatsapp सुरु झाल्यास तुमच्या मोबाईलचे इंटरनेट वापरले जाणार नाही. याच स्टेप्स फाॅलो करुन तुम्ही अॅंड्राइड आणि आयफोनवरही ही सुविधा वापरु शकतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here