Using Multiple SIMs : एकापेक्षा जास्त सिमकार्ड वापरली तर अतिरिक्त भूर्दंड पडणार नाही, ट्रायचं स्पष्टीकरण

Using Multiple SIMs : दीर्घकाळ सेवेत नसलेले टेलिफोन क्रमांक मात्र ट्राय बंद करणार आहे.

161
Using Multiple SIMs : एकापेक्षा जास्त सिमकार्ड वापरली तर अतिरिक्त भूर्दंड पडणार नाही, ट्रायचं स्पष्टीकरण
  • ऋजुता लुकतुके

एकापेक्षा जास्त सिमकार्ड बाळणाऱ्या ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार अशी एक बातमी अलीकडेच सर्वत्र पसरली होती. पण, दूरसंचार नियामक संस्था अर्थाच, ट्रायने ही शक्यता फेटाळून लावली आहे. ही बातमी खोटी असून खोडसाळपणे पसरवण्यात आली असल्याचं ट्रायनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. (Using Multiple SIMs)

‘सध्याच्या बँडविड्थमध्ये सर्वांना मोबाईल आणि लँडलाईन सेवा मिळावी. कुणीही सेवेपासून वंचित राहू नये यासाठी एकापेक्षा जास्त सिमकार्ड आणि लँडलाईन कनेक्शन घेणाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल, अशी बातमी काही प्रसारमाध्यमांनीही दिली होती. पण, ही बातमी निराधार आणि पूर्णपणे तथ्यहीन आहे,’ असं शुक्रवारी ट्रायने स्पष्ट केलं. (Using Multiple SIMs)

(हेही वाचा – T20 World Cup Saurabh Netravalkar : अमेरिकन संघातील विश्वचषक स्टार खेळाडू सौरभ नेत्रावळकर सामन्यानंतर हॉटेलमधून करतो ऑफिसचं काम)

मोबाईल किंवा लँडलाईन सेवा वापरणाऱ्या ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी टेलिकम्युनिकेशन्स आयडेंटिफायर म्हणून एक कोड वापरण्यात येतो. आणि असे निर्धारित कालावधीत वापरात नसलेल्या टीआय कोडसाठी काही करता येईल का, अशा सूचना ट्रायने अलीकडेच संबंधित यंत्रणेला आणि मोबाईल कंपन्यांकडून मागवल्या होत्या. ट्राय सध्या नवीन मोबाईल क्रमांक धोरण ठरवण्यावर काम करत आहे. त्यासाठी ६ जूनला त्यांनी कंपन्यांकडून सूचना मागवल्या. (Using Multiple SIMs)

पण, काहींनी त्याचा चुकीचा अर्थ काढला. एकापेक्षा अधिक नंबर बाळगले तर त्यासाठी अतिरिक्त शुल्क लागेल अशी अफवा बाजारात पसरली. (Using Multiple SIMs)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.