अलीगड शहराचे नाव बदलून हरिगड करण्याचा प्रस्ताव महापालिकेत एकमताने मंजूर झाला आहे. त्यामुळे आता अलाहाबादनंतर उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) या मोठ्या शहराचे नावही लवकरच बदलणार आहे. अलीगड शहराचे नाव बदलण्याचा प्रस्ताव महापौर प्रशांत सिंघल यांनी मांडला होता. त्याला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवला होता. आता केवळ उत्तर प्रदेश सरकारकडून मंजुरीची प्रतिक्षा आहे.
अलीगड शहराचे नाव बदलण्यासंदर्भात महापौर प्रशांत सिंघल म्हणाले की, सोमवारी झालेल्या बैठकीत अलीगडचे नाव बदलून हरिगड करण्यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला होता. याला सर्व नगरसेवकांनी एकमताने पाठिंबा दिला. आता हा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्यात येणार आहे. प्रशासन याकडे लक्ष देऊन आणची मागणी पूर्ण करेल, अशी आशा आहे. अलीगडचे नाव बदलून हरिगड करण्यासंदर्भात गेल्या बऱ्याच दिवसांपासून मागणी सुरू आहे.
(हेही वाचा – Google Pixel 8A : गुगलचा ‘हा’ फोन आहे स्वस्तात मस्त)
२०२१ साली जिल्हा परिषदेच्या बैठकीत अलीगडचे नाव बदलून हरिगड करण्याचा प्रस्ताव मंजूर करून तो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्याआधी २०१९ साली मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी आपले सरकार राज्यभरातील ठिकाणांची नावे बदलण्याची प्रक्रिया सुरू ठेवेल, असे संकेत दिले होते.
याबाबत योगी आदित्यनाथ म्हणाले होते, आम्ही तेच केले, जे आम्हाला योग्य वाटले. आम्ही मुगल सरायचे नाव बदलून पंडित दीन दयाल उपाध्याय नगर, अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज आणि फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या जिल्हा केले. यापुढेही आवश्यक तेते सरकार पावले उचलेल, असे याबाबत योगी आदित्यनाथ म्हणाले होते.
हेही पाहा –